Kalyan Crime 
क्राईम

Kalyan Crime: आंबिवलीतील इराणी चोरट्याचा एन्काउंटर; चोरीसाठी विमानाने प्रवास करत गाठायचा चेन्नई

Kalyan Crime: कल्याणजवळील आंबिवली येथील इराणी इराणी चोरट्याचा चेन्नईत एन्काउंटर करण्यात आलाय. चोरीसाठी विमानाने प्रवास करत तो चेन्नईला जात असायचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याणजवळील आंबिवली येथील इराणी वस्तीची चोरट्यांची वस्ती अशी ओळख आहे .या वस्तीमधील अनेक इराणी चोरट्याना पोलिसांनी चैन स्नेचिंग , बाईक चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे तर अनेक चोरटे हे अद्यापही फरार आहेत. याच वसाहतीत राहणाऱ्या जाफर गुलाम हुसेन इराणी या 28 वर्षीय चोरट्याचा चेन्नईमध्ये एन्काऊटर करण्यात आल्याची माहिती कल्याण पोलिसांनी दिली.

या चकमकीत त्याच्यासोबत असलेले दोघेजण देखील जखमी झाले आहेत. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जाफरविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात कल्याण पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई देखील केली होती. आठ महिन्यापूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. जाफर राज्याबाहेरही चोऱ्या करत होता. महाराष्ट्रातील विविध शहरात चोऱ्या करत जाफर आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने थेट विमानाने चेन्नईला पोहचला होता.

जाफर विमानाने चेन्नई गाठायचा तेथील शहरात चैन स्नॅचिंग करायचा. चोरी केल्यानंतर पुन्हा विमानाने परत महाराष्ट्रात येत असायचा. काल मंगळवारी हा चोरटा पोलिसांच्या तावडीत गावला. चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडलं. पण पोलिसावर हल्ला करत त्याने पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने चोरलेले दागिने चेन्नई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या बरोबर असलेल्या इतर दोघांनाही पोलिसांनी जखमी अवस्थेत ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT