क्राईम

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Ranchi Girls Hostel Turns Out to Be Brothel Racket: रांची पोलिसांनी रविवारी शहरातील एका खाजगी मुलींच्या वसतिगृहावर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यादरम्यान पश्चिम बंगालमधील १० महिलांना ताब्यात घेण्यात आले.

Bharat Jadhav

  • रांची पोलिसांनी खाजगी गर्ल्स हॉस्टेलवर धाड टाकली.

  • हॉस्टेलच्या आड वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघडकीस आलं.

  • पश्चिम बंगालमधील १० महिलांना पोलिसांनी अटक केली.

गर्ल्स हॉस्टेलच्या नावाने भलतेच उद्योग सुरू असल्याची बाब उघडकीस आलीय. झारखंडची राजधानी रांचीमध्ये वसतिगृहाच्या नावाखाली हा उद्योग सुरू होता. रांची पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर पश्चिम बंगालमधील १० महिलांना अटक करण्यात आलीय. हे सर्वजण वेश्या व्यवसायात सहभागी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

डीएसपी (शहर) कुमार व्ही रमण म्हणाले की, पकडलेल्या सर्व महिला या रॅकेटचा भाग होत्या. त्यांना सेक्स रॅकेट चालवण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यासर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये त्यापैकी बहुतेक व्यावसायिक आहेत. त्या सर्व पश्चिम बंगालचे आहेत. संपूर्ण गेममध्ये सहभागी असलेल्या हॉस्टेल वॉर्डनलाही अटक करण्यात आली आहे.

रांची शहरातील महिला वसतिगृहात सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या टोळीमागे एका दलालचा हात असल्याचे उघड होत आहे. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती डीएसपी यांनी दिलीय. हे प्रकरण केवळ या वसतिगृहापुरते मर्यादित नाही. शहरातील इतर काही ठिकाणीही छापे टाकले जात आहेत."तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. सर्व आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती लालपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी रूपेश कुमार यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update खोल समुद्रात इंजिन बंद पडल्याने मच्छीमार बोट अडकली

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहच्या दिवशी ही गोष्ट नक्की करा, बदलेल तुमचं नशीब

Political News : शिंदेंना मोठा धक्का, ज्येष्ठ नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', काँग्रेसमध्ये केला प्रवेश

Pooja Sawant Photos: पूजा सावंतचा पहिला मराठी चित्रपट कोणता?

Maharashtra Politics: 'लाचारी'वरून 'राज'कारण तापलं! एकनाथ शिंदेंचा नेता ठाकरेंवर भडकला

SCROLL FOR NEXT