jaysingpur sessions court sentenced pradip jagtap to be hanged by neck till death kolhapur news sml80 saam tv
क्राईम

Kolhapur News : जयसिंगपूर सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच आरोपीला फाशीची शिक्षा; जाणून घ्या खटला

Kolhapur : पाेलिसांनी या खटल्याची पार्श्वभूमी सांगताना प्रदीप आणि त्याची पत्नी रूपाली यांच्यात नेहमी भांडणे होत असत. प्रदीपला पत्नीच्या चरित्राचा संशय होता.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

पत्नीच्या चरित्राचा संशय घेऊन सासू, पत्नी, मेव्हणा, मेहुणी या चौघांचा खून केल्याप्रकरणी आरोपीला मंगळवारी (ता. 26 मार्च) जयसिंगपूर अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने (jaysingpur sessions court) फाशीची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. प्रदीप विश्वनाथ जगताप (pradeep vishwanath jagtap) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

पाेलिसांनी या खटल्याची पार्श्वभूमी सांगताना प्रदीप आणि त्याची पत्नी रूपाली यांच्यात नेहमी भांडणे होत असत. प्रदीपला पत्नीच्या चरित्राचा संशय होता. त्यावरून आॅक्टाेबरमध्ये सन 2018 कालावधीत एका रात्री दोघांमध्ये भांडण झाले होते.

त्यानंतर तो पुन्हा पहाटे चार वाजता घरी आला. त्याने मागाच्या लाकडी माऱ्याने सासू छाया आयरेकर, पत्नी रूपाली, मेहुणी सोनाली अभिजीत रावण, मेहुणा रोहित श्रीपती आयरेकर यांना डोक्यात मारहाण केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामध्ये पत्नी आणि मेहुणा जागीच मृत्यू पावले. सासू आणि मेहुणी या सांगली येथे उपचार घेत असताना मृत्यू पावल्या. या प्रकरणी न्यायाधिश गिरीश गुरव यांच्या समाेर झालेल्या सुनावणीत आराेपी प्रदीप जगताप यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान जयसिंगपूर न्यायालयात फाशीची शिक्षा होण्याची ही पहिली घटना आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जैतोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

Government Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी कंपनीत नोकरी; ११८० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Dharangaon : आश्रम शाळेतील १५ हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण; धरणगाव तालुक्यात खळबळ, आरोग्य यंत्रणा नजर ठेवून

Divorce Celebration : माय लाइफ माय रूल! दुग्धाभिषेक केला, सूट बूट घालून केक कापला; घटस्फोटानंतर तरुणाचं जंगी सेलिब्रेशन | Video

Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचाराचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट|VIDEO

SCROLL FOR NEXT