Jalna News Saam Tv
क्राईम

Shocking : तलाठ्याचा धक्कादायक प्रताप, पेन्शनच्या फाईलवर सही करण्यासाठी चक्क बियर बारच्या बिलाची मागणी

Jalna News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकलांग पेन्शन योजनेसाठी अर्जावर सही देण्यासाठी तलाठ्याने बियर बारचे बिल भरण्याची मागणी केली. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • जालना जिल्ह्यात तलाठ्याने बियर बारमध्ये सहीसाठी बिल भरण्याची मागणी केली.

  • विकलांग महिलेच्या अर्जावर नशेत सही करून ती खोडल्याचा धक्कादायक प्रकार.

  • नातेवाईकांनी मोबाईल कॅमेऱ्यात तलाठ्याचा भ्रष्टाचार कैद केला.

  • महसूल विभागात खळबळ; कारवाईची मागणी जोर धरते.

जालना जिल्ह्यातील भोकरदन महसूल विभागाच्या नाजा सज्याच्या तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या' अर्जावर सही आणि शिक्का देण्यासाठी चक्क तलाठी महाशयाने बियर बारच्या बिल भरण्याची मागणी केली. नातेवाईकांनी बिल भरण्यास नाकार दिल्याने तलाठ्याने मद्यधुंद अवस्थेत बियर बार मध्येच उभा राहून अर्जावर केलेली सही खोडल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा गावातील विकलांग असलेल्या सुनीता जाधव या महिलेने नातेवाईकांच्या मदतीने "इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून अर्ज केला.मात्र या अर्जावर तलाठी यांची स्वाक्षरी आणि शिक्का लागत असल्याने महिलेने वारंवार तलाठ्यांशी संपर्क केला.

मात्र तलाठी भेटत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांनी फोन करून सही आणि शिक्क्याची मागणी केली. दरम्यान बियर बार मध्ये बसलेल्या तलाठ्यांनी नातेवाईकांना बार वर बोलावून घेत नशेच्या अवस्थेत पैशाची मागणी केली. तसेच नातेवाईकांना सोबत बसा म्हणत नशेच्या अवस्थेत बारचं बिल भरण्यास सांगितली. आणि अर्जावर सही देखील केली.

नातेवाईक बिल भरणार नसल्याचं लक्षात येताच तलाठी महाशयाने चक्क अर्जावरील सही खोडली. शिवाय बार मध्येच अर्ज करणाऱ्या महिलेला सामोरं आणा म्हणत महिलेला बार मध्ये बोलवण्याचा हट्ट धरला. तलाठीने संबंधित महिलेच्या नातेवाईकांना कसा अर्ज मंजूर होतो अशी धमकी देखील दिली. हा संपूर्ण प्रकार महिलेच्या नातेवाईकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. दरम्यान तलाठ्याने एका सहीसाठी दाखवलेला माजुर्डेपणा उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर पोलीस या तलाठीवर कशाप्रकारची कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहेर कॉम्प्यूटर सेंटरचं पोस्टर, आत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी तरूणींना रंगेहाथ पकडलं

Curd Water : दह्याला सुटलेले पाणी प्यावे की टाकून द्यावे? वाचा तज्ज्ञांचे मत

Weekly Horoscope : मिथुन, मीनसह ७ राशींना पूर्वजांचा आशीर्वाद; खुलणार करिअरचे दरवाजे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Dark Chocolate Cake: वजन आणि हृदयासाठी फायदेशीर डार्क चॉकलेट केक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

India Tourism: खंडाळ्याला हमखास विसराल! वसईपासून ५ तासांच्या अंतरावर आहे 'हे' सुंदर पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT