Jalna Crime News Saam Tv
क्राईम

Crime: किरकोळ वाद डोक्यात गेला, धारधार शस्त्राने वार करत बायकोची हत्या, नंतर तरुणाने स्वत:लाही संपवलं

Jalna Police: जालन्यामध्ये किरकोळ वादातून नवरा-बायकोंचा घरगुती वादा झाला. या वादातून संतापलेल्या नवऱ्याने बायकोची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जालन्यात खळबळ उडाली.

Priya More

अक्षय शिंदे, जालना

जालन्यामध्ये भयंकर घटना घडली. नवऱ्याने बायकोची हत्या करून नंतर स्वत: देखील आयुष्य संपवलं. जालन्यातील पारध येथे ही हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सध्या जालना पोलिस करत आहेत. आई-वडिलांच्या जाण्यामुळे दोन मुलं पोरकी झाली यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील पारध येथे कौटुंबिक वादातून बायकोची हत्या करून नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली.जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक गावात ही हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोच्या डोक्यामध्ये धारदार पाहर घातली. नवऱ्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

बायकोचा मृत्यू झाल्यानंतर नवऱ्याने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. समाधान अल्हाट आणि किर्ती अल्हाट अशी मृत नवरा बायकोंची नावं आहेत. समाधान आणि किर्ती यांच्यात सतत कौटुंबिक कारणांवरून वाद व्हायचे. या वादातूनच समाधानने शनिवारी बायकोची हत्या करून आत्महत्या केली. या घटनेमुळे पारध येथे खळबळ उडाली.

शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पारध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले. या प्रकरणी रात्री उशिरा पारध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. समाधान आणि किर्ती यांना दोन मुलं आहेत. आई-वडिलांच्या सोडून जाण्यामुळे या दोन्ही बालकांचे भवितव्य अंधारमय झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

22 वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; कुटुंबीय, नातेवाईकांचा गोंधळ, मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला

Mumbai To Shirdi : साईनगरी शिर्डीला जाताय? मुंबईहून कमी खर्चात 'या' सोप्या मार्गाने करा प्रवास

Maharashtra News Live Update : कल्याण बुद्धभूमी फाऊंडेशन प्रकरण; बुद्धभूमीकडून १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

खुशखबर! लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Women's T20 League: सोबो मुंबई फाल्कन्सच्या महिलांनी रचला इतिहास, पहिल्याच मुंबई लीगमध्ये शानदार विजेतेपदाचा मान

SCROLL FOR NEXT