jalna Saam tv
क्राईम

jalna Shocking : जालना हादरलं! आश्रम शाळेत मध्यरात्री 8 वर्षांच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

jalna News update : जालन्यात ८ वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने भोकरदन परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

जालना येथील आश्रम शाळेत ८ वर्षीय विद्यार्थ्याची दोरीने गळा आवळून हत्या झाली.

हत्या करणारे दोघेही अल्पवयीन असून ते वसतिगृहातीलच विद्यार्थी आहेत.

पोलिसांनी दोन्ही विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतलं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

किरकोळ वादातून मध्यरात्री ही हत्या झाली असून पोलीस सखोल तपास करत आहेत.

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना : जालन्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. जालन्यात किरकोळवादातून निवासी आश्रम शाळेतील 8 वर्षाच्या मुलाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. मुलांच्या वस्तीगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी दोरीने गळा आवळून ८ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. जालन्यातील भोकरदन येथील गणपती विद्यालय निवासी आश्रम शाळा वसतिगृहात ही घटना घडली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांच्या मालकीच्या संस्थेत हा खळबळजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर भोकरदन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

जालन्यातील भोकरदन येथील गणपती विद्यालय निवासी आश्रम शाळेच्या वस्तीगृहामध्ये किरकोळ वादातून एका आठ वर्षीय विद्यार्थ्यांची दोरीने गळा आवळून हत्या केली. बालवीर पवार असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास किरकोळ वादातून वस्तीगृहात सोबत राहणाऱ्या 8 वर्षीय आणि 13 वर्षीय दोन दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा दोरीने गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी या हत्येची कबुली दिल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे. खेळताना झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL खेळण्यासाठी आला अन् हॉटेलमध्ये बोलावलं, लैंगिक शोषण करत..; क्रिकेटपटूवर जयपूरमध्येही गुन्हा

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये

Bhandara Rain : भंडारा जिल्ह्याला रेड अर्लट , शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

Maharashtra Live News Update: आज वाशिम बाजार समिती राहणार बंद, अडत्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकले

Government Employees: मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ३० दिवसांची भरपगारी सुट्टी

SCROLL FOR NEXT