Police investigation underway in Betul village after a shocking family murder case in Madhya Pradesh. Saam tv
क्राईम

Jalgaon Crime: ५ वर्ष दोघांचं सुरू होतं अफेअर, विवाहितेच्या नकरानंतर डोकं सटकलं; इंस्टाग्रामवरील प्रेमाचा भयानक अंत

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावात दुहेरी हत्याकांडात झाला आहे. प्रियकराने एका विवाहित महिलेवर गोळी झाडून तिची हत्या केली त्यानंतर आत्महत्या केली.

Bharat Jadhav

  • इंस्टाग्रामवरील पाच वर्षांचे प्रेमप्रकरण दुहेरी हत्याकांडात संपले.

  • विवाहितेवर गोळ्या झाडून हत्या; आरोपीने केली आत्महत्या.

  • घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावात घडली.

अकुलखेडा गावात इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या एका प्रेमप्रकरणाचा अंत दुहेरी हत्याकांडाने झाला. ३० वर्षीय विवाहितेची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःचेही जीवन संपवल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला. ही घटना घडली होती शनिवारी.

हा अकुलखेडा येथील पाटील कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतली तेव्हा तिला तिची आई आणि एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर तिने शेजाऱ्यांना याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिासांना दिली. पोलिसांनी केलेल्या तपास धक्कादायक बाब उघडकीस आली.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय तरुणाची एका विवाहितेबरोबर इंस्टाग्रामवर ओळख झाली. या दोघाच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या दोघाचे प्रेम प्रकरण पाच वर्षे सुरू होतं. विवाहितेला दोन मुले होती, तर तरुण देखील विवाहित होता. या नात्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती.

परंतु काही दिवसापासून तरुण आणि विवाहितेच्या नात्यात मिठाचा खडा पडला होता. विवाहितेने तरुणाची बोलणे टाळण्यास सुरुवात केली होती. तो वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र विवाहिता त्याच्याशी बोलत नव्हती. याच रागातून त्याच्या डोक्यात सूडाची भावना निर्माण झाली. शनिवारी सकाळी तो आपली दुचाकी घेऊन थेट अकुलखेडा येथे विवाहितेच्या घरी पोहोचला.

तिथे पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात त्याने आपल्यासोबत आणलेल्या गावठी पिस्तूलमधून विवाहितेच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने त्याच पिस्तूलने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी आणि गावठी पिस्तूल जप्त केले आहे. विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Raigad : शत्रूंना कायम आव्हान देणारा जलदुर्ग; समुद्राच्या लाटांमध्ये दडलाय राजेशाही इतिहास, सुट्ट्यांमध्ये 'हा' किल्ला पाहाच

Maharashtra News Live Update: संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरात एकादशी निमित्ताने रंगीबेरंगी आकर्षक देशी विदेशी फुलांची आरास

Pandharpur Shocking : फोटो-व्हिडिओ पाहिलेत का? नराधमाने पाठवलेले अश्लील मेसेज पाहताच महिला भडकली, पोलिसांत गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी करूनही लाडकींचे पैसे अकडलेत? ₹१५०० कधीपासून मिळणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट

CM थलपती विजय दिल्लीत, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT