Jaipur Crime News X (Twitter)
क्राईम

Crime News : क्रूरतेचा कळस! बायकोनं प्रियकराच्या साथीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह गोणीत भरला अन् जंगलात नेऊन जाळला..

Jaipur Crime News : मेरठमध्ये एका महिलेने प्रियकरासह पतीचा खून केला होता. मृतदेहाचे तुकडे एका ड्रममध्ये लपवले. या धक्कादायक घटनेची पुनरावृत्ती जयपूरमध्ये झाली आहे. एका महिलेने तिच्या नवऱ्याचा मृतदेह गोणीत भरुन ठेवला.

Yash Shirke

Crime : एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. हत्या करुन त्यांनी मृतदेहाचे तुकडे करुन एका ड्रममध्ये लपवले. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. उत्तरप्रदेशच्या मेरठमधील या धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान राजस्थानच्या जयपूरमध्ये मेरठच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जात आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थानच्या जयपूरमधील गोपाली देवी सैनी (वयवर्ष ४२) या महिलेचे दीनदयाल (३०) नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. गोपाली देवी या दीनदयाल याच्या दुकानामध्ये काम करत असे. तर तिचा नवरा धन्नालाल सैनी हा भाजी विकण्याचे काम करत असे. धन्नालालला दोघांच्या प्रेमसंबंधांबद्दल समजले. रागाच्या भरात तो दीनदयालच्या दुकानात पोहोचला. दीनदयाल, गोपाली देवी आणि धन्नालाल यांच्या बाचाबाची झाली. पुढे भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. तेव्हा गोपाली देवी आणि दीनदयाल यांनी केलेल्या मारहाणीमध्ये धन्नालालचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवऱ्याचा मृतदेह गोपाली देवी आणि तिच्या प्रियकराने प्लास्टिकच्या एका गोणीत भरला. त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गोणी दुचाकीवरुन एका अज्ञात ठिकाणी नेली. ठरलेल्या जागी पोहचल्यावर त्यांनी गोणीसकट मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक लोकांनी जळालेल्या मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली.

तपास करुन पोलिसांनी आरोपी गोपाली देवीला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान गोपाली देवीने गुन्ह्याची कबुली दिली. हत्या केल्यानंतर धन्नालालचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरला आणि ७ किलोमीटर लांब ठिकाणी जाऊन जाळला, असे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गोपाली देवीच्या पतीला देखील ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT