Crime News: प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न ठरलं; सनकी आशिकनं पालकांसमोरच मुलीच्या भावाला संपवलं, नंतर..

Kerla Crime : केरळमधील कोल्लम शहरात एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या भांडण झालेल्या गर्लफ्रेंडच्या भावाची हत्या केलीय. प्रेयसीच्या पालकांसमोरच त्याने चाकू हल्ला केलाय.
Mumbai Crime: किरकोळ वाद, बेदम मारहाण; नवऱ्याने बायकोचा जीव घेतला, आवाज येऊ नये म्हणून गमछा तोंडात कोंबला
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On

केरळमध्ये एका सनकी आशिकने प्रेयसीच्या भावाची हत्या केल्याची घटना घडलीय. प्रेयसीच्या पालकांसमोरच तिच्या भावाची चाकू भोसकून हत्या केली. हत्येनंतर आरोपीनेही आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना घडलीय केरळमधील कोल्लममध्ये घडली. मृत मुलाचे नाव फेबिन जॉर्ज गोमेझ वय २१ असं आहे. तर प्रेयसीच्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव तेजस राज होतं.

अशी झाली हत्या

हत्येची घटना सोमवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. तेजस राज कोल्लमच्या उलियाकोवी भागात त्याची प्रेयसी राहत होती. त्या घर प्रियकर तेजस गेला. तेथे त्याने प्रेयसीचा भाऊ फेबिन जॉर्ज गोमेझला चाकू भोसकत त्याचा खून केला. फेबिनवर तेजस राज जेव्हा चाकू हल्ला करत होता त्यावेळी, त्याचे वडील जॉर्ज यांनी फेबिनला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात तेही जखमी झाले. फेबिनवर हल्ला केल्यानंतर तेजस राज कारने तीन किलोमीटर अंतरावर गेला. तेथील एका रेल्वे रुळाजवळ थांबला आणि तेथे त्याने आत्महत्या केली.

Mumbai Crime: किरकोळ वाद, बेदम मारहाण; नवऱ्याने बायकोचा जीव घेतला, आवाज येऊ नये म्हणून गमछा तोंडात कोंबला
Shocking Crime: लंडनहून आलेल्या नवऱ्याला संपवले; डोकं, हात, पाय तोडले, १५ तुकडे ड्रममध्ये लपवले; बायकोचा कट

काय आहे प्रकरण का केली प्रेयसीची हत्या?

तेजस आणि फेबिनची बहीण याचे प्रेमसंबंध होते त्यांच्या प्रेमसंबंधाला त्यांच्या घरातील सदस्यांची मान्यता होती. दोघेही वेगवेगळ्या समाजाचे होते, तरीही त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे नाते मान्य होते. परंतु नोकरी मिळत नसल्याने राज नैराश्यात गेला होता. त्यानंतर तेजस आणि त्याच्या प्रेयसीमध्ये दुरावा निर्माण झाला. तेजसची प्रेयसी बँकेत नोकरीला होती.

Mumbai Crime: किरकोळ वाद, बेदम मारहाण; नवऱ्याने बायकोचा जीव घेतला, आवाज येऊ नये म्हणून गमछा तोंडात कोंबला
Crime News: पत्नीच्या कटकटीचा वैताग; व्हिडिओत कैफियत मांडत माजी पोलीस अधिकाऱ्यानं स्वत:वर झाडली गोळी

तर तेजस हा पोलीस दलात नोकरीसाठी प्रयत्न करत होता. त्याने काँस्टेबल पदासाठीच्या लेखी परीक्षा दिली होती त्यात तो पास झाला होता. परंतु शारीरिक परीक्षेत नापास झाला, यामुळे तो नैराश्यात गेला. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर महिलेने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला. तसेच तिच्या कुटुंबियांनी देखील त्याला तिचा विचार सोडून देण्यास सांगितले. त्यामुळे तो अजून जास्त चिडला, त्याचा राग त्याच्या मनात होता.

एफआयआरमध्ये धक्कादायक खुलासा

फेबिनच्या आईने पोलिसांना सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न जमवलं होतं. त्याचा राग तेजसला आला होता. तेजस प्रेयसीच्या पालकांना तिच्या भावाला मारण्याच्या उद्देशाने घरी आला होता. , सोमवारी संध्याकाळी तेजसने फेबिनचे वडील जॉर्ज यांच्यावर हल्ला केला. त्यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर त्याने फेबिनला गंभीर जखमी केले. या हल्ल्याचे दृश्य सीसीटीव्हीने टिपले आहेत. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये चाकूने वार केल्यानंतर फेबिन घरातून बाहेर पळताना दिसतोय. त्यानंतर तो रस्त्यावर कोसळताना दिसतोय. त्यानंतर स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com