Yerwada Jail Crime News  Saam TV
क्राईम

Pune Crime News: येरवडा कारागृहात कैद्यांकडून तुरुंग अधिकाऱ्याला बेदम मारहाण; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Yerwada Jail: येरवडा कारागृहातील काही कैद्यांनी मिळून चक्क तुरुंग अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. पठाण असं मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

Yerwada Jail Crime News

मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विद्येचं माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यातही गुन्हेगारांनी कळस गाठला आहे. एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे येरवडा कारागृहातून एक भयानक घटना समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येरवडा कारागृहातील काही कैद्यांनी मिळून चक्क तुरुंग अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये गुरुवारी (१५ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे अशी आरोपींची नावे असून शेरखान पठाण असं मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली आहे. तसेच उजवा हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पठाण यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे हे दोघे ही सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनी गुरुवारी सकाळी किरकोळ कारणावरून पठाण यांच्यासोबत वाद घातला. यावेळी आरोपींनी इतर १० कैद्यांना सोबत घेऊन पठाण यांच्यावर हल्ला चढवला.  (Latest Crime News)

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जर पोलिसच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. महिन्याभरापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती.

यानंतर पोलिसांनी परिसरात हैदोस घालणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. मात्र, आता या गुंडांनीच चक्क पोलिसांच्या अंगावरच हात उचलणे सुरू केलं आहे. तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण करणारे गुंड आंदेकर टोळीतील असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT