Cryptocurrency Invest Scam Saam Tv
क्राईम

Crime News: डेटिंग अ‍ॅपवर जोडीदार शोधण्याच्या नादात गमावले ४ कोटी; व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट करताच लावला चुना

Cryptocurrency Invest Scam: अमेरिकामध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेचा लग्नासाठी ऑनलाईन साईटवरून जोडीदार शोध सुरू होता. एका डेटिंग साईटवर तिला एक व्यक्ती भेटला, त्याच्याशी तिचं बोलणं सुरू झालं. पण याच दरम्यान तिला तब्बल ४ कोटी रुपयांचा चुना लागलाय. नेमका काय आहे हा प्रकार.

Bharat Jadhav

Dating App Cryptocurrency Invest Scam :

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय महिलेला ऑनलाईन साथीदार शोधणं महागात पडलं आहे. डेटिंग अॅपवर भेटलेल्या एका व्यक्तीने डीपफेकच्या वापर करत महिलेला ४ कोटी रुपयांचा गंडा घातलाय. मद्य विक्री करणारा असल्याचं भासवत त्या व्यक्तीने महिलेकडून ४ कोटी रुपये उकाळले आहे.(Latest News)

या महिलेचं नाव श्रेया दत्ता असून ती फिलाडेल्फियामध्ये राहते. काही दिवसांपूर्वी तिची ओळख अँसेल नावाच्या व्यक्तीशी झाली होती. हे दोघांची ओळख डेटिंग अॅपवर झाली होती. अँसेल नावाच्या व्यक्तीने त्याची ओळख करून देताना तो मद्य विक्री करणारा व्यापारी असल्याचं सांगितलं. परंतु तो एक क्रिप्टो स्कॅमर निघाला. डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर अँसेलने श्रेयाशी गप्पा करणं सुरू केलं. श्रेयाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने ४.५० लाख डॉलर्सची (सुमारे ३.७३ कोटी रुपये) फसवणूक केली. एका माध्याम संस्थेशी बोलताना श्रेयाने सांगितलं की, अँसेलने डीपफेक व्हिडिओ आणि एक स्क्रिप्टचा वापर करत तिला फसवलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अँसेलने श्रेयाकडून पैसे उकाळण्याआधी त्याने तिला त्याच्या प्रेमात अडकवलं आणि नंतर त्यांना एका क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले जातात. दरम्यान या प्रकारच्या प्रकरणाला 'पिग बुचरिंग' म्हटलं जातं. ज्याप्रमाणे वराह शेती केली जाते, त्याचप्रमाणे पीडितेला लक्ष्य केलं जातं. आधी पैसे गुतंवण्यास सांगितलं जातं, गुंतवलेल्या पैशात वाढ झाल्याचं दाखवलं जातं. नंतर त्याने जमा झालेले पेसे घेऊन समोरील सायबर स्कॅमर फरार होत असतो

या प्रकरणाची माहिती देताना श्रेयाने सांगितले की, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तिने Hinge या डेटिंग ॲपवर अँसेलशी बोलणे सुरू केले. यानंतर व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू झाले. दरम्यान श्रेया घटस्फोटित महिला आहे. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत अँसेलने तिच्याशी गट्टी जमवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. मागील वर्षी अँसेलने तिला एक बुके पाठवला. गप्पा करताना अँसेलने श्रेयाला लवकर रिटायरमेंटचा प्लान सांगितला होता. त्यानुसार श्रेया पैसे जोडत होती. त्यानंतर अँसेलने तिला एक क्रिप्टो ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं.

त्याची एक लिंक पाठवली. पण ही लिंक फेक होती. हे श्रेयाला कळलं नाही त्याने विश्वासाने त्यात पैसे गुंतवणे सुरू केले. तिने बचत केलेला संपूर्ण पैसा त्यात गुंतवला. भारतीय चलनानुसार तिने तब्बल ४ कोटी रुपये यात गुंतवले. मात्र ज्यावेळी तिने पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ॲपने वैयक्तिक कराची मागणी केली. श्रेयाने ही गोष्ट लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या भावाला सांगितली. जेव्हा त्याच्या भावाने अँसेलचे फोटो रिव्हर्स शोधले. तेव्हा कळले ते फोटो जर्मनीतील एका प्रसिद्ध व्यक्तीचे आहेत. त्यानंतर त्यांची फसवणूक झाली, हे लक्षात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT