illegal liquor worth rupees 1 crore 7 lakhs seized in pune and maval  Saam Digital
क्राईम

Pune Crime News : पुण्यासह मावळात मोठी कारवाई, हातभट्टी दारू अड्डयावर छापा; 1 कोटी 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

तळेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सराफ यांना माहिती मिळताच त्यांनी तीन टीम तयार करून तिन्ही ठिकाणी छापा टाकला. सर्व हातभट्टी दारू तयार करण्याचा रसायन नष्ट केले.

Siddharth Latkar

- सागर आव्हाड / दिलीप कांबळे

Pune News :

आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या गावठी हातभट्टी दारू अड्डयावर पुणे पाेलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाेलिसांनी लाखो लिटर हातभट्टी दारू नष्ट केली. तसेच पाेलिसांनी एक कोटी सहा लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दिली. दरम्यान मावळ येथे अवैधरित्या गावठी हातपट्टी दारू तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत एक लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. (Maharashtra News)

मावळ मध्ये अवैद्यरित्या गावठी दारू बनवणाऱ्या भट्टीवर तळेगाव दाभाडेचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. तळेगाव दाभाडे परिसरात अवैधरित्या गावठी दारू बनवून ती विक्री केली जात होती.

मुठांवरे वेहेरगाव,आंबी अशा तीन गावांमध्ये ह्या अवैधरित्या गावठी दारू तयार करणे आणि विक्री करण्याच्या हातभट्ट्या होत्या. तळेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सराफ यांना माहिती मिळताच त्यांनी तीन टीम तयार करून तिन्ही ठिकाणी छापा टाकला. सर्व हातभट्टी दारू तयार करण्याचा रसायन नष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान पोलिसांची चाहूल लागतात गावठी हातभट्टी तयार करणारे मालक पसार होण्यात यशस्वी झाले. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाने ही कारवाई केली. एकूण तीन ठिकाणी छापा टाकून चार हजार 900 लिटर गावठी हातभट्टी दारू ज्याची किंमत एक लाख 88 हजार असून ती पूर्ण नष्ट करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगड किल्ल्यावर रोप वे सेवा 6 दिवस बंद राहणार

Attractive Womens Qualities: आकर्षक दिसणाऱ्या महिलांमध्ये कोणते गुण असतात?

Gold Rate Today : आजही सोन्याचे दरात मोठी घसरण, प्रति तोळा 'इतक्या' रूपयांवर घसरलं, वाचा 24, 22 आणि 18k ताजे दर

Fertility Problems: करिअरच्या नादात मोठी चूक? नोकरी करणारे ६०% कपल्स प्रजननाच्या आरोग्य तपासणीकडे फिरवतात पाठ

EPFOमध्ये बँक अकाउंट अपडेट कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT