illegal liquor of over rs 5 lakh seized by excise department in dharashiv saam tv
क्राईम

Dharashiv Crime News : तुळजापूर तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाची धाड, 5 लाखांची दारु जप्त

Dharashiv Latest Marathi News : लोकसभा निवडणुकीची धांदल सुरु असतानाच उत्पादन शुल्क विभागाची कारवाई झाल्याने बेकायदेशिर व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यातील खडकी तांडा येथे साडेपाच लाखांची अवैध गावठी दारू आणि निर्मितीचे साहित्य पकडले. या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणा-यांवर जरब बसेल अशी चर्चा सुरु आहे. (Maharashtra News)

खडकी तांडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध गावठी निर्मिती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. याच अनुषंगाने सापळा रचून तब्बल पाच लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.

या प्रकणी तिघांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीची धांदल सुरु असतानाच ही कारवाई झाल्याने बेकायदेशिर व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT