Hyderabad Crime News Saam Tv
क्राईम

Hyderabad Crime News: संतापजनक! पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली, घरी परतताना महिलेवर सामूहिक अत्याचार

Hyderabad News: हैदराबादमध्ये रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका महिलेवर कथित सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

हैदराबादमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. येथील लोथकुंटा येथे 13 जुलै रोजी सकाळी रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका महिलेवर कथित सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.. याप्रल येथील रहिवासी असलेली २९ वर्षीय महिला तिच्या पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी अलवल पोलीस ठाण्यात गेली होती. घरी परतत असताना महिलेसोबत ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी संध्याकाळी ही महिला तिच्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी अलवल पोलीस ठाण्यात गेली होती. पोलीस ठाण्यात जाण्यासाठी तिने उबर मार्फत रिक्षा बुक केली होती.

पुढे तक्रार नोंदवल्यानंतर महिला घरी परतत असताना स्टेशनजवळ थांबली होती. महिला स्टेशनजवळ उभी असताना एक रिक्षाचालक तिच्या जवळ आला आणि कुठे जायचं आहे, विचारत महिलेला रिक्षात बसण्यास सांगितलं. यानंतर महिला रिक्षात बसली.

एफआयआरनुसार, महिला रिक्षात बसल्यानंतर पुढे रिक्षाचालकाने रिक्षा एका वाईन शॉपजवळ थांबवली, जिथे त्याचे दोन साथीदार रिक्षात बसले. हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. या दोघांनी महिलेवर जबरदस्ती करत तिला दारू पिण्यास भाग पाडले.

यानंतर रिक्षाचालक रिक्षा अलवल येथील व्यंकटराव लेनवरील निर्जन भागात घेऊन गेला. तेथे पोहोचल्यानंतर या तिघांनी महिलेला धमकावले. यानंतर आरोपींनी महिलेला रिक्षात नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

शनिवारी पहाटे 2:45 च्या सुमारास पीडितेने तेथून कसाबसा पळ काढला आणि गणेश मंदिरात पोहोचली, जिथे तिने स्थानिक लोकांकडे मदत मागितली. यानंतर महिलेने डायल 100 सेवा वापरून पोलिसांना फोन केला आणि बोलाराम पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात नेले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं. तर त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT