Hyderabad Crime Saam Tv
क्राईम

Crime: आधी दारू पाजली, बिर्याणीही खाऊ घातली; नंतर महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केल्याने जागीच संपवलं

Hyderabad Crime: हैदराबादमध्ये ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे हैदराबाद हादरले आहे. महिलेला आधी दारू पाजली नंतर बिर्याणी खाऊ घातली. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Priya More

हैदराबादमध्ये एका ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादच्या किस्मतपूरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी ३ जणांना पोलिसांनी अटक केली. महिलेला आरोपींनी आधी दारू पाजली नंतर बिर्याणीही खाऊ घातली. त्यानंतर त्यांनी महिलेला एका पुलाखाली नेऊन त्याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने विरोध केला तेव्हा आरोपींनी काठीने मारहाण करत तिची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मन हेलावून टाकणारी घटना १४ सप्टेंबर रोजी घडली. महिला दारूच्या नशेत एका खांबाजवळ उभी राहिली होती. त्याठिकाणी एका ३३ वर्षीय व्यक्तीची नजर या महिलेवर पडली. या व्यक्तीने या महिलेला आमिष दाखवत रिक्षामध्ये बसवले. वाटेत त्याने तिला बिअर पाजली आणि बिर्याणी खायला घातली. त्यानंतर एका हॉलजवळ नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला आरामघर एक्स रोडवर सोडून दिले. पण तिच्या अडचणी काही संपल्या नाहीत. त्याच रात्री २५ ते २६ वर्षांचे दोन ऑटो रिक्षाचालक या महिलेजवळ पोहचले. त्यांनी या महिलेला जबरदस्ती रिक्षामध्ये बसवले आणि किस्मतपूर पुलाखाली घेऊन गेले. त्याठिकाणी दोन्ही रिक्षाचालकांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. महिलेने विरोध केला तर त्यांनी तिची काठीने मारहाण करत हत्या केली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला आणि फरार झाले.

१६ सप्टेंबरला स्थानिक नागरिकांनी झाडाझुडपात महिलेचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी राजेंद्रनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये पोलिसांनी आरोपींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळया ठिकाणावरून त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Rain : अहिल्यानगरमध्ये रस्ते वाहून गेले, पण दूध उत्पादकाने दोरीच्या साह्याने पोहोचवले दुधाचे कॅन | VIDEO

Metro : आता मेट्रोत रिल्स, व्हिडिओ कराल तर कारवाई होणार, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: माढामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला

Dharashiv flood crisis : शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेंना घेरलं, धाराशिवकर आक्रमक | VIDEO

Mumbra Railway Station : 'मुंब्रा' स्टेशनचे नाव अज्ञाताने अचानक बदलले, स्टेशनच्या फलकावर लावले दुसरे नाव

SCROLL FOR NEXT