Kolhapur Crime News  saam tv
क्राईम

Shocking : 'आज तुझा तर शेवट' स्टेट्स ठेवलं', एसटी स्टँडवरच बायकोला संपवलं; भयानक घटनेनं कोल्हापूर हादरलं

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील पेठवडगावात एक भयानक घटना घडली आहे. येथील बस स्टँण्डवर एक व्यक्तीने कोयत्याने हल्ला करत आपल्या पत्नीचा खून केला आहे. या घटनेने कोल्हापूर शहर हादरले आहे.

Bharat Jadhav

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा एसटी स्टँड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्ससमोर सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

या हल्ल्यात अमृता दीपक कांबळे (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, संशयित दीपक लाडू कांबळे (वय ३५, रा. सावर्डे) याने आठ वर्षांपूर्वी अमृता यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुली असून, पती- पत्नीमध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. आज अमृता कांबळे या एका वकिलाला भेटण्यासाठी एसटी स्टँडमागील कॉम्प्लेक्समध्ये आल्या असताना दीपक कांबळे तेथे पोहोचला.

दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने अमृता यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमृता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ला रोखण्यासाठी काही नागरिकांनी प्रयत्न केला. मात्र, "ही माझी पत्नी आहे, तुम्ही मध्ये पडू नका," असे म्हणत आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की करत घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाची वडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात चारित्र्याच्या संशयातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Transgender Fight: बस्ती मागण्यावरून वाद विकोपाला; आळंदीच्या इंद्रायणी घाटावर तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

Baba Vanga 2026 : 2026 मध्ये मोठं संकट? नेपाळच्या आपत्तीनंतर जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगांची भविष्यवाणी चर्चेत

Baba Bageshwar: मटण-मासे खाणारे 'पाखंडी'! धीरेंद्र शास्त्रींच्या मांसाहारावरील विधानाने वाद पेटला

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT