Crime News Saam TV
क्राईम

Uttar Pradesh Crime : जेवण द्यायला उशिर झाल्याने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या; पतीने नंतर स्वत:लाही संपवलं

Crime News : यामध्ये तिला थोडा उशिर झाला. पतीच भुक तोवर आणखी वाढली. जेवण उशिरा दिल्याने यावरून दोघांमध्ये वाद झाला. पतीचा रागाचा पारा फार वाढला. रागाच्या भरात त्याने पत्नीला मारहाण केली

Ruchika Jadhav

Uttar Pradesh News :

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. यूपीच्या सीतापूरमध्ये एका पती-पत्नीचे राहत्या घरात मृतदेह आढळून आलेत. पतीने स्वत: आपल्या पत्नीची हत्या केलीये. त्यानंतर त्याने स्वत: देखील गळफास घेऊन जीवन संपवलंय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थानगांव पोलीस स्टेशन परिसरातील कोटवालनपुरवा गावात ही घटना घडली आहे. परसराम असं पतीचं नाव आहे. तर प्रेमा देवी असं पत्नीचं नाव आहे. पती त्याचं काम करून घरी आला होता. दिवसभर काम करून त्याला भुक लागली होती. त्यामुळे त्याने पत्नीकडे जेवण मागितलं. पत्नीने लगेच जेवण बनवण्यास सुरूवात केली.

यामध्ये तिला थोडा उशिर झाला. पतीच भुक तोवर आणखी वाढली. जेवण उशिरा दिल्याने यावरून दोघांमध्ये वाद झाला. पतीचा रागाचा पारा फार वाढला. रागाच्या भरात त्याने पत्नीला मारहाण केली. काही वेळाने त्याने रागात आपल्याच पत्नीवर चाकूने हल्ला केला. पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पहिल्यावर त्याचं डोकं ठिकाणावर आलं.

झालेल्या प्रकारामुळे तो खुप घाबरला. पत्नी गेल्याचं दु:ख आणि पोलिसांच्या भीतीने त्याने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले आणि गळफास घेतला. ही घटना घडली तेव्हा शेजारी हे सर्व पाहत होते. त्याने स्वत:ला कोंडून घेतल्यावर नागरिकांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Death : जादुई आवाज हरपला! प्रसिद्ध गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: "बापट जाऊ द्या ना", अखेर विद्यानंद बापट यांच्यावर रॅप साँग प्रदर्शित

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! रिक्षा आणि पिकअपची जोरदार धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू; ५ जण गंभीर

शहरात राहणाऱ्या नोकरदारांची लॉटरी! केंद्र सरकारची मोठी घोषणा; घरांसाठी सुरू केली 'ही' योजना

Traffic News: घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी कमी होणार; गायमुख-पायेगाव खाडी पुलाच्या पायलिंगचं ९५ टक्के काम पूर्ण

SCROLL FOR NEXT