Crime x
क्राईम

Crime : पती बनला हैवान, रागाच्या भरात पत्नीला जिवंत जाळलं; माहेरी फोन करुन सांगितलं अन्...

Crime News : एकाने त्याच्या पत्नीला जिवंतपणे जाळले आणि पत्नीच्या माहेरी फोन करुन मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर आरोपी त्याच्या कुटुंबीयांसह पळून गेला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

  • बिहारच्या नालंदामध्ये पतीने पत्नीला जिवंत जाळलं

  • पत्नीच्या मृत्यूची माहिती देऊन आरोपी फरार

  • दोन वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर भीषण घटना

Shocking : एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची निर्घुणपणे हत्या केली. आरोपीने त्याच्या पत्नीला जिवंत जाळले. या भयानक कृत्याने संपूर्ण परिसर हादरुन गेला. आरोपीने पत्नीच्या माहेरी तिच्या मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर आरोपी आणि त्याचे कुटुंबीय पळून गेले. ही धक्कादायक घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एका गावात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालंदामधील इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चुल्हण बिघा गावात हा प्रकार घडला आहे. मृत महिलेचे नाव सुनीता देवी (वय २५ वर्षे) असे आहे. तर तिच्या पतीचे, आरोपीचे नाव विकास कुमार असे आहे. सुनीता देवी हीच्या माहेरच्या मंडळींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सुनीताच्या माहेरच्यांनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, विकास कुमारने सुनीताला जिवंत जाळले. त्यानंतर मृत्यूची माहिती देण्यासाठी फोन केले. जेव्हा तिच्या माहेरकडचे नातेवाईक सासरी पोहोचले, तेव्हा आरोपी विकाससह सासरचे सर्वजण पळून गेले होते. यानंतर माहेरच्यांनी पोलिसांना संपर्क केल्याचे म्हटले जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत सुनीताचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. विकासने सुनीताला का जाळले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे पोलीस सध्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. विकास आणि सुनीता यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. विकासला दारूचे व्यसन होते. त्याला हुंड्यात लाखो रुपये रोख, एक बाईक, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर अनेक वस्तू मिळाल्या होत्या, अशी माहिती सुनीताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

कंठ दाटला, शब्दही फुटत नव्हते....अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार भावुक|VIDEO

Ajit Pawar Death: राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

Ajit Pawar Death: अजितदादांनी गावकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी काम केलं; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

SCROLL FOR NEXT