West Bengal Crime News Saam Tv
क्राईम

Crime: मित्रासोबत जेवायला कॉलेजबाहेर गेली, वाटेत तिघांनी अडवलं अन् ओढत जंगलात नेलं, MBBS च्या विद्यार्थिनीवर बलात्कार

West Bengal Crime News: पश्चिम बंगालमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. कॉलेज कॅम्पसबाहेरून या विद्यार्थिनीला खेचत नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

Priya More

पश्चिम बंगालमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये ही घटना घडली. २३ वर्षीय विद्यार्थिनी तिच्या कॉलेज कॅम्पसबाहेर मित्रासोबत जेवायला गेली होती त्यावेळी ही भयंकर घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. आरोपीच्या शोधासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. पीडित विद्यार्थिनी मूळची ओडिशाची रहिवासी आहे. या घटनेमुळे विद्यार्थिनींचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पीडितेने सांगितले की, 'ती तिच्या मित्रासोबत कॅम्पसबाहेर जेवायला गेली होती. तेव्हा काही अज्ञात लोकांनी तिला अडवले. त्यानंतर तिचा मित्र घटनास्थळावरून पळून गेला. त्या लोकांनी तिला जबरदस्तीने जवळच्या जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.' विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की, 'माझी मुलगी तिच्या मित्राच्या सांगण्यावरून जेवायला गेली होती. ३ जण त्यांचा पाठलाग करू लागले. तिचा मित्र तिला सोडून पळून गेला. माझ्या मुलीनेही पळू जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तिला पकडले आणि तिच्यासोबत भयंकर कृत्य केले.

विद्यार्थिनीच्या आईने पुढे सांगितले की, ३ जणांनी माझ्या मुलीला जवळच्या जंगलात नेले. तिथे आणखी दोन जण त्यांच्यासोबत आले. त्यापैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला. तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. आवाज केला तर तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी आरोपीने दिली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी त्वरित कारवाईची मागणी केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला वेग आणला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

Sleeping: गरजेपेक्षा जास्त झोपण्याचा आरोग्यावर होतो परिणाम, होतील 'हे' गंभीर आजार

Paid Menstrual Leave: सरकारीच नव्हे, खासगी क्षेत्रातही महिलांना मासिक पाळीदरम्यान भरपगारी सुट्टी

Crime News: कमी वयाच्या मुलाला घरात बोलवून ठेवायची शारीरिक संबंध; नंबर ब्लॉक करताच दिली सुपारी, माजी महामंडलेश्वरचं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal Pune Land Mafia Exposed: घायवळ पुण्यातला लँड माफिया? पोलिसांच्या तपासात कारनामे उघड

SCROLL FOR NEXT