Inter-caste marriage sparks violence in Kharpudi, Pune; woman abducted by her family — honor killing suspected saam tv
क्राईम

Pune Crime: मला माहिती नाही माझ्या पत्नीचं काय झालं, खरपुडीमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार?

Pune Honor Killing : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयासह मुलीला जबर मारहाण करण्यात आलीय. मुलीच्या आई आणि भावाने दोघांना भरचौकात बेदम मारहाण केली. तरुणीला मारहाण केल्यानंतर तिचे अपहरण केले गेले.

Bharat Jadhav

  • खरपुडीमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला मारहाण.

  • विवाहितेचं तिच्याच आई-भावाकडून अपहरण.

  • पतीने व्यक्त केली ऑनर किलिंगची शक्यता.

  • पोलिसांकडून तपास सुरू, परिसरात खळबळ.

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

पुण्याच्या राजगुरुनगर जवळील खरपुडीमध्ये आंतरजातीय विवाह केल्यानं उच्चशिक्षित दाम्पत्याला मारहाण करण्यात आलीये. मारहाणीनंतर विवाहितेच तिच्याच आई आणि भावांनी अपहरण ही केलंय. या घटनेने एकच खळबळ उडालीये. हा ऑनर किलिंगची तर घटना नाही ना? अशी भिती व्यक्त केली जातीये.

हा व्हिडीओत नेमकं काय घडतंय? हे समजल्यावर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. पोटच्या मुलीला आई अन भावाने मारहाण करत अपहरण केलंय.घरच्यांचा विरोध डावलून पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी गावच्या प्राजक्ता काशीद ने तिच्याच गावातील विश्वनाथ गोसावीसोबत 5 ऑगस्ट 2024ला आंतरजातीय विवाह केला. 28 वर्षीय मुलीने 43 वर्षीय विश्वनाथशी लग्न केलं त्यातच ते आंतरजातीय असल्यानं प्राजक्ताचे कुटुंबीय चिडून होते. त्यातूनच 3 ऑगस्टला मुलीसह जावयाला बेदम मारहाण करत, प्राजक्ताचे अपहरण केलं.

विश्वनाथ गोसावी यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिलीय. दुपारी एक वाजेपर्यंत आम्हाला मारहाण केली. माझ्या पत्नीला आणि मला बेदम मारलं. माझ्या पत्नीला जबरदस्तीनं घेऊन गेलेत. मला माहिती नाही माझ्या पत्नीचं काय झालं? अशी प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान आंतरजातीय विवाहातून ही घटना घडल्यानं हे ऑनर किलिंग आहे का? अशी भीती व्यक्त केली जातीये.

विश्वनाथ गोसावी यांनी त्यांच्या सासू, मेहुण्यासह 15 ते 16 जणांविरोधात मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ही घटना घडल्यानं, यामागे काही अँगल आहे का? ऑनर किलिंग आहे का? अशा सर्व अंगांनी तपास सुरुय.

राज्यात आंतरजातीय विवाहातून अनेकदा असे धक्कादायक प्रकार घडलेत. ज्यातून अनेक तरुण-तरुणींना जीव ही गमवावा लागलाय. पुरोगामी महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या नावाखाली आज ही घडणाऱ्या या घटना, नक्कीच महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे. पण प्रश्न आहे, या घटना कधी आणि कशा रोखल्या जाणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

SCROLL FOR NEXT