Hingoli Crime News Saam TV
क्राईम

Hingoli Crime News: भररस्त्यात गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या; थरारक घटनेनं नागरिकांमध्ये घबराट

Crime News: भर रस्त्यात गळा चिरून एक युवकाची हत्या करण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आहे. पोलिसांना घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतलीये.

Ruchika Jadhav

Hingoli News:

हिंगोलीमधून काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. भर रस्त्यात गळा चिरून एक युवकाची हत्या करण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आहे. पोलिसांना घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतलीये.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबा चोंढी फाट्याजवळ ही घटना घडली आहे. एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी येथे धाव घेतली. राहुल गवळी रा. जुनोना असं खून झालेल्या मयत तरुणाचं नाव आहे. खूनाचे कारण अद्याप आस्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायरान जमिनीच्या कारणावरून दोन गटात तेढ निर्माण होऊन तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत एका तरुणावर वार करण्यात आला. घटनेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चोंडी रेल्वे स्टेशन परिसरात येथे ही घटना घडली आहे.

राहुल गवळी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शुल्लक कारणांवरून व्यक्तींमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. रागाच्याभरात व्यक्ती काय करेल आणि काय नाही याचा काहीच नेम नाही याचीच प्रचिती या घटनेवरून आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT