Nafe Singh Rathi Shot Dead Google
क्राईम

Crime News: खळबळजनक! अनेक किमीपर्यंत गाडीचा पाठलाग, बेछुट गोळीबार; हरियाणात आयएनएलडीच्या प्रदेशाध्यक्षाची हत्या

INLD Chief Nafe Singh Rathi Shot Dead: आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग यांची हरियाणातील बहादूरगडमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

Haryana Crime News

हरियाणातील (Haryana) बहादूरगडमध्ये आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येला अनेक तास उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपींचा सुगावा लागू शकलेला नाही. नफे सिंगच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी दोन डीएसपी आणि विशेष टास्क फोर्स तपासात तैनात करण्यात आले आहेत. (Latest Crime News)

रविवारी नफे सिंग एका ओळखीच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावरून परतत होते. तेव्हा काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या (INLD Chief Nafe Singh Rathi) गाडीवर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या फॉर्च्युनर कारवर मागून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. गाडीवर 40 ते 50 वेळा गोळीबार केला. या हल्ल्यात केवळ नफे सिंग राठी यांचा मृत्यू झाला नाही, तर त्यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यालाही प्राण गमवावे लागले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नफे सिंग यांची गोळ्या झाडून हत्या

नफे सिंग यांच्यावर हल्ला झाला, त्यावेळी त्यांच्या कारमध्ये एकूण पाच जण उपस्थित होते. ड्रायव्हरसोबत नफे सिंग पुढच्या सीटवर बसले होते, तर त्यांचे तीन सुरक्षा रक्षक मागच्या सीटवर बसले (Nafe Singh Rathi Shot Dead) होते. सायंकाळी पाचच्या सुमारास हा हल्ला झाला. नफे सिंग आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाला अनेक गोळ्या लागल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. त्यांच्या इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही मांडीला आणि खांद्यावर गोळ्या लागल्या. त्यांच्या ताफ्यात इतर अनेक वाहने धावत होती. त्यांचा मुलगा माध्यमांशी बोलताना म्हणाला की, वडिलांनी सुरक्षा मागितली होती. पण त्यांना मिळाली नाही. नफे सिंह यांचा मुलगा जितेंद्र राठी यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या वडिलांनी सीएम मनोहर सिंग खट्टर यांना अनेकवेळा भेटून सुरक्षेची विनंती केली होती, पण कोणीही ऐकलं नाही. आता त्यांच्या वडिलांना जीव गमवावा लागला आहे. करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नफे सिंगची हत्या कोणी केली? याला उत्तर देताना जितेंद्र राठी म्हणाले की, यामागे तेच लोक आहेत, जे त्यांच्या वडिलांच्या मागे बहादुरगडमध्ये होते. त्यांना माझ्या वडिलांना आमदार म्हणून बघायचे (Crime News) नव्हते. यात काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे, लवकरच त्यांची नावे बाहेर येतील. आयएनएलडीने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नफे सिंग राठी यांच्या हत्येबाबत इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रवक्ते अमनदीप म्हणाले की, त्यांना यापूर्वीही अनेक जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. याआधीही त्यांच्यावर हल्ले झाले होते. त्यामुळे अनेकदा संरक्षणाची मागणी करण्यात आली, पण संरक्षण मिळालं नव्हतं.

माजी आमदार आणि पक्षाध्यक्ष नफे सिंग ((Nafe Singh Rathi) यांच्या हत्येनंतर पक्षाचे नेते अभय चौटाला यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरल्याबद्दल गृहमंत्री अनिल विज आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT