Sunny Leone Threats: बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी येत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या, सनी लियोनीने केला धक्कादायक खुलासा

Sunny Leone Interview: खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री सध्या फ्रान्सला आहे. ती नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहिली होती. तिने यावेळी एक महत्वाचा खुलासा केला.
Sunny Leone Receiving Threats
Sunny Leone Receiving ThreatsSaam Tv

Sunny Leone Receiving Threats:सिनेसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री ते कान्स २०२३ पर्यंत एक यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री सध्या फ्रान्सला आहे. ती नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहिली होती. तिने यावेळी एक महत्वाचा खुलासा केला, तिच्या आयुष्यात असे काही लोक होते, ज्यांना ती एक पॉर्न स्टारच्या पुढे जाऊ नये असे वाटत होते. या कारणामुळे, जेव्हा ती 'बिग बॉस 5' चा भाग बनण्यासाठी भारतात येणार होती, तेव्हा तिला जीवे मारण्याच्या धमक्या आणि बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत होत्या.

Sunny Leone Receiving Threats
Gadar To Re - Release : सनी देओल- अमिषा पटेल जोडी दिसणार एकत्र, २२ वर्षांनंतर 'गदर: एक प्रेम कथा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

सनी लिओनीने डेडलाइनला दिलेल्या मुलाखतीत, “मी खूप अस्वस्थ होते. मला अडल्ट चित्रपट सृष्टीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. त्यामुळेच बिग बॉसच्या निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मी याविषयी डॅनियलसोबत संवाद साधला. डॅनियलने मला भारतात जाण्याचा सल्ला दिला. पण, मी तयार नव्हते. मी डॅनियलला म्हणाले, “नाही, हे अजिबात शक्य नाही. मी भारतात जाऊ शकत नाही. तिथे सगळे माझा तिरस्कार करतील.” पण, शोच्या निर्मात्यांनी हार मानली नाही. ते वारंवार संपर्कात राहिले.”

Sunny Leone Receiving Threats
Aamir Khan-Fatima Sana Shaikh Wedding Rumors: आमिर खान करतोय तिसरे लग्न? बॉलिवूड अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ

सनी पुढे म्हणाली, 'अखेर मी त्या शोसाठी हो म्हणाली. पण, शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. काहींनी तर मला जीवे मारण्याची धमकी दिली. तर काहींनी, मला या शोचा भाग होणार असेल तर ते मला बॉम्बने उडवून देतील. अशी धमकी दिली. पण तरीही मी शोमध्ये येण्यासाठी धाडस केले आणि शोचा भाग बनले. तुम्हाला सांगतो, 'बिग बॉस 5'चा भाग झाल्यानंतर सनी लिओनी रातोरात स्टार बनली. 'बिग बॉस 5' मध्ये असताना तिला महेश भट्टच्या 'जिस्म 2' या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि त्यानंतर तिने आपल्या सिनेकारकिर्दित एकदाही मागे वळून पाहिले नाही. सनीच्या सिनेकारकिर्दिची आजही बरीच चर्चा होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com