Woman jumps into well with kids Saam Tv
क्राईम

Latur Crime: गॅसवर स्वयंपाक का केला? सासरच्यांकडून सुनेचा छळ; महिलेने दोन चिमुकल्या मुलांसह संपवलं आयुष्य

Woman jumps into well with kids: लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने सासरच्यांकडून छळ झाला म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बाती समोर आली आहे. लातूरमधील खरोसा इथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये सासरच्यांच्या छळाला कंटाळून एक विविहित महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीये. यावेळी तिने एकटीने विहिरीत उडी घेतली नसून तिच्या दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. यामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरला आहे.

किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल

हाती आलेल्या माहितीनुसार, स्वयंपाक घरात गॅसवर जेवण बनवण्यावरून या महिलेच्या घरात वाद झाला होता. या किरकोळ वादातून महिलेला सासरच्यांनी मानसिक त्रास आणि छळ करण्यास सुरुवात केली. तिचा सतत छळ होऊ लागल्याने संबंधित तरूणी कंटाळली आणि तिने स्वतःच्या दोन मुलांसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

जेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली तेव्हा संपूर्ण गावात खळबळ उडाली. यावेळी सासरच्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये धाव घेण्यात आली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळता किल्लारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

दोन मुलांसह आत्महत्या केलेल्या महिलेच्या सासरच्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलीस तपास देखील करत आहेत. ही घटना नेमकी का घडली आणि त्यामागचं कारण शोधण्याचाही प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu : ३९व्या वर्षी सामंथा रुथ प्रभु आई होणार? 'त्या' व्हायरल VIDEO ने सुरू झाली चर्चा

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT