Crime x
क्राईम

Crime : घरात घुसून जिम थेरपिस्टचा विनयभंग, त्रासाला कंटाळून तरुणी विषारी औषध प्यायली, नंतर...

Crime News : सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळलेल्या महिला जिम थेरपिस्टने डास मारण्यासाठीचे विषारी औषध पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

  • जिम थेरपिस्ट तरुणीवर छेडछाडीचे आरोप, घरात घुसून विनयभंग केल्याचा दावा.

  • त्रासाला कंटाळून तरुणीने ऑलआउट प्यायले, रुग्णालयात दाखल.

  • पोलिस तपास सुरू; आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाईची शक्यता.

Shocking News : छेडछाडीला कंटाळलेल्या एका ३७ वर्षीय तरुणीने डास मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणीला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही तरुणी जिम थेरपिस्ट असल्याचे म्हटले जात आहे. परिसरातील काही तरुणांनी तिचा विनयभंग केला आणि घरात घुसून अश्लील वर्तन केले असा आरोप तरुणीने केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील रायपुरवा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.

शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रात्री तरुणी एका कार्यक्रमातून रात्री घरी परतली. शेजारी राहणाऱ्या तरुणांनी तिला सतत बेल वाजवून त्रास दिला. दार उघडल्यानंतर हे तरुण घरात घुसले. त्यांनी तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, अश्लील शेरेबाजी केली. मुलीने आरडाओरडा करुन तिचा जीव वाचवला. आवाजामुळे आसपासचे लोक घटनास्थळी दाखल झाले.

लोकांची गर्दी पाहून आरोपी धमकी देऊन पळून गेले. या प्रसंगानंतर नैराश्यात जाऊन तरुणीने डास मारण्यासाठीचे विषारी औषध पित आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याआधी तिने एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तरुणीने झालेल्या अत्याचारांबद्दल सांगितले. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले.

परिसरातील तरुण पीडितेला दररोज त्रास देत होते. त्यांनी तरुणीवर विनयभंग केल्याचे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळून लागले आहेत. या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे म्हटले जात आहे. मुलीने केलेले आरोप खरे आहेत असे आढळल्यास आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Winter Lip Care: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPATचा वापर शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका | VIDEO

डॉक्टर महिलेसोबत अफेअरचा संशय, भावाकडून KEM रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने वार

SCROLL FOR NEXT