Saam Tv
क्राईम

Crime News : धाराशीवमध्ये रक्तरंजित थरार! रिक्षा चालकाची दिवसाढवळ्या हत्या, धक्कादायक कारण

Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात जुन्या वादातून रिक्षा चालकाची भरदिवसा कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून परिसरात भीतीचे वातावरण आहे

Alisha Khedekar

धाराशिव जिल्ह्यात भरदिवसा रिक्षा चालकाची कुऱ्हाडीने हत्या

जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यामुळे गावात तणावाचे वातावरण

आरोपी निखिल कांबळे तासाभरात पोलिसांच्या ताब्यात

मृत गुरुसिद्धाप्पा दहिटणे यांच्या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण

धाराशिव जिल्ह्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून भर दिवसा रिक्षा चालकाची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. मृत रिक्षा चालकाचं नाव गुरुसिद्धाप्पा दहिटणे असे आहे. तर, निखिल कांबळे असे या हल्लेखोरांच नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे भर दिवसा गुरुसिद्धाप्पा दहिटणे आणि निखिल कांबळे यांच्यात जुन्या वादाने पुन्हा तोंड वर काढले. या दोघांमध्ये भर दिवसा जोरदार भांडण झालं. हे भांडण एवढ्या टोकाला गेलं की निखिल कांबळेने दहिटणे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात दहिटणे यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर हल्लेखोर निखिलने घटनास्थळावरुन पळण्याचा डाव रचला, मात्र त्याचा डाव अवघ्या तासाभरात उध्वस्त झाला. मूळचा पुण्याचा असणारा निखिल त्याच्या मूळगावी म्हणजेच पुण्याला जाण्यासाठी निघाला. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो पुण्याकडे रवाना झाला. नळदुर्ग पोलिसांनी हल्लेखोर निखिल याला पुण्याला जात असताना तांदळवाडी परिसरातून ताब्यात घेतले.

आरोपी निखिलवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. दरम्यान हा हल्ला का झाला? हा हल्ला करण्यामागे नेमकं काय कारण होत हे अद्यापही समोर आलेलं नाही. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT