Gujrat Crime News:  Saam tv
क्राईम

Gujrat News: लेकासाठी ४० लाखाचं कर्ज काढलं; परदेशात जाताच मुलाने नात तोडलं, माता- पित्याची आत्महत्या

Gujrat Crime News: आपल्या माता- पित्याशी बोलणे कमी केले तसेच त्यांनी संपर्क केला तरी बोलणे टाळू लागला. डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणि मुलाचा विरह माता- पित्याला सहन झाले नाही, याच तणावातून दोघांनी आत्महत्या केली

Gangappa Pujari

आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावे, नाव कमवावे अशी प्रत्येक माता- पित्याची इच्छा असते. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, सुखासाठी आई- वडिल आयुष्यभर कष्ट घेतात. मुलाचे सुख, ऐश्वर्य डोळे भरुन पाहावं, लेकाने म्हातारपणी आधाराची काठी व्हावं, अशी त्यांची इच्छा असते. मात्र गुजरातमधून एक मन सुन्न करणारी आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

६६ वर्षीय चुन्नीभाई गेडिया आणि ६४ वर्षीय मुक्ता हे गुजरातमधील दांपत्य. या दोघांनीही आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येआधी त्यांनी लिहलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. ज्यामध्ये मुलासाठी ४० लाखांचे कर्ज फेडता न आल्याने तसेच मुलगा बोलत नसल्याच्या तणावातून हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

पियुष असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. तो फायनान्स व्यापार करायचा. या व्यापारात त्याला मोठे नुकसान होऊन तो कर्जबाजारी झाला. त्याचे कर्ज फेडण्यासाठी त्याच्या वडिलांनी ४० लाख रुपये उसने घेतले होते. मुलगा कॅनडाला जाऊन पैसे परत करेल, अशी त्यांना आशा होती. मात्र कॅनडाला जाताच पियुष पुर्णपणे बदलून गेला. त्याने आपल्या माता- पित्याशी बोलणे कमी केले तसेच त्यांनी संपर्क केला तरी बोलणे टाळू लागला. डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणि मुलाचा विरह माता- पित्याला सहन झाले नाही, याच तणावातून दोघांनी आत्महत्या केली.

पत्रात काय लिहलं?

"त्यामुळे माझे वय आता ६४५ वर्ष झाले आहे. मी कामही करू शकत नाही. माझा कोणताही व्यवसाय नाही, त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे. पियुषचे कर्ज फेडण्यात मी कर्जबाजारी झालो. मी व्याज म्हणून ३५ लाख रुपये आणून त्याला दिले. पियुष गेल्या 4 वर्षांपासून कॅनडामध्ये राहत आहे. या काळात त्यांनी मला एकदाही फोन केला नाही. मी पियुषला दोनदा व्हिडिओ कॉल केला, पण त्याने फोन उचलला नाही. कर्जदार माझ्यावर कोणताही दबाव टाकत नाहीत. मी माझ्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा ऋणी आहे, पण आता मला लाज वाटते, असे त्यांनी या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT