Gujrat Surat Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : स्टॅमिनाच्या गोळ्या खायचा, रात्री अगणित छळ करायचा... वैतागलेल्या बायकोनं नवऱ्यासोबत असं काही केलं की हादरून जाल!

Gujrat Surat Crime News : गुजरातमध्ये पत्नीने पतीला दुधातून उंदीर मारण्याचे औषध देऊन व नंतर गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • गुजरातमध्ये पत्नीने पतीची केली निर्घृण हत्या

  • दुधातून उंदीर मारण्याचे औषध देऊन विषप्रयोग

  • विषप्रयोगातून वाचल्यानंतर गळा दाबून हत्या

  • भावाच्या संशयामुळे गुन्हा उघड; पत्नी अटकेत

गुजरातमध्ये एका महिलेने पतीला दुधातून उंदीर मारण्याचं औषध देऊन त्याची हत्या केली असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या घेऊन नवरा जबरदस्ती करत असल्याने महिलेने हे पाऊल उचलले असल्याचं तिने म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव इशरत जहाँ उर्फ ​​इशरत खातू असे आहे. तर तिच्या पतीचे नाव हैदर अली असे आहे. हैदर कामानिमित्त मुंबईत असतो आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये तो सुरतमध्ये येतो. ३१ डिसेंबर २०२५ नंतर १ जानेवारी २०२६ रोजी हैदर सुरतमध्ये आला होता. त्यानंतर त्याची पत्नी इशरत ही दररोज थोडं थोडं करून हळदीच्या दुधात उंदीर मारण्याचं औषध मिसळायची. आणि ते दूध हैदरला द्यायची. ५ जानेवारी रोजी हैदरला अचानक खूप त्रास होऊ लागला.

त्याला ताबडतोब सुरतच्या स्माइमर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. या उपचारादरम्यान त्याचा जीव वाचला म्हणून इशरतने पुन्हा हैदरची गळा दाबून हत्या केली. या हल्ल्यात हैदरचा मृत्यू झाला. सुरुवातीला इशरतने कुटुंबाला सांगितले की मृत्यू किरकोळ आजारामुळे झाला आहे.

मात्र हैदरच्या भावाला हैदरच्या पत्नीवर संशय होता. या संशयामुळे त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत वेगाने तपास करण्यास सुरुवात केली. या तपासादरम्यान हैदरची पत्नीचं गुन्हेगार असल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली असून चौकशी दरम्यान इशरत म्हणाली की, हैदर स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या घेऊन तिचा वारंवार लैंगिक छळ करत होता आणि तिला मारहाण करत होता. या छळाला कंटाळून तिने हैदरला जीवे मारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वाचला म्हणून तिने त्याचा गळा दाबून हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जो महापौरपद देतील, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, 'या' महापालिकेत भाजप-ठाकरेसेनेची युती होण्याची शक्यता

Kolhapur Mayor Race: कोल्हापुरात महापौरपदाची ‘खांडोळी’ की स्थैर्य? महायुतीतच महापौर पदावरून रस्सीखेच

अजित पवारांसह विमानात ५ जण होते की ६ जण..? शंकांचं काहूर सुरू असतानाच उज्ज्वल निकम यांनी नेमकं काय सांगितलं? VIDEO

Maharashtra Live News Update: अलिबागच्या आंबेपूर मतदार संघात शिवसेनेचे बॅनर फाडले

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?

SCROLL FOR NEXT