Crime News Saam TV
क्राईम

Gujarat News : IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची गळफास लावून आत्महत्या; कारण अस्पष्ट

Gujarat : गुजरातमधील आयपीएस अधिकारी आरटी सुसारा यांच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १ डिसेंबरला अहमदाबाद येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gujarat Crime News:

गुजरातमधील आयपीएस अधिकारी आरटी सुसारा यांच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १ डिसेंबरला अहमदाबाद येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे. शालूबेन असं आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचं नाव आहे. शालूबेन यांचा मृतदेह घरात एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

शालूबेन या सूरत येथे गेल्या होत्या. गुरुवारी रात्री सुरतहून अहमदाबादला आल्यानंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासादरम्यान उघडकीस आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने बोडकदेव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शालूबेन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

नक्की काय घडले?

२०११ बॅचचे आयपीएस अधिकारी आर टी सुसारा हे सध्या सूरतमधील हजीरा येथे पोलीस अधीक्षक म्हणून मरीन टास्क फोर्समध्ये कार्यरत आहे. सुसारा आणि त्यांची पत्नी सूरतमध्ये एका लग्नासाठी गेले होते. तेथून गुरुवारी दोघे परतले. त्यानंतर घरात सुसारा यांना तळमजल्यावर एका खोलीत बायकोचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत त्यांनी लगेच स्थानिक पोलिसांना कळवले.

पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता शालूबेन यांनी रात्री उशीरा आपले जीवन संपवल्याचे समोर आले. परंतु अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या, प्रशासनाने दिली 50 हजारांची मदत

Harmful Habits : तुम्हीही एकाच दमात पाण्याची बाटली संपवताय? 'ही' छोटीशी चूक बेतेल जीवावर

Prostitution Racket : धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यसाय, पोलिसांनी धाड टाकली अन्...

Dahi Handi Horoscope : आज या राशींना मिळू शकतो आर्थिक लाभ! दहीहंडी आणि शिक्षक दिनाचा योग; पंचांगात काय आहे खास? वाचा

Bad Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रात्री पायांमध्ये दिसतात 'ही' ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे पडेल महागात

SCROLL FOR NEXT