Police investigation underway in Vadodara after a shocking family murder case. Saam tv
क्राईम

Crime News: धक्कादायक ! जीवन विमा काढून जीव घेतला, पहिला हप्ता भरल्यानंतर बहिणीनं बॉयफ्रेंडला दिली सुपारी

Crime News Gujarat: गुजरातमध्ये एक खळबळजनक घटना घडलीय.पैशांपुढे जगातील सर्व नाती छोटी आहेत, पैशांच्या हव्यासापोठी आपल्या रक्ताच्या नाती सुद्धा परकी होतात, हे गुजरातीमधील एका घटनेने सिद्ध झालंय. मोठ्या बहिणीने पैशांसाठी तिच्या धाकट्या बहिणीचा जीव घेतल्याची घटना वडोदरामध्ये घडलीय.

Bharat Jadhav

  • पैशांच्या हव्यासापोटी मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना.

  • धाकट्या बहिणीच्या नावावर जीवन विमा काढून मोठी बहीण नॉमिनी बनली होती.

  • पहिला प्रीमियम भरल्यानंतरच हत्येचा कट रचण्यात आला

गुजरात येथील एका महिलेने आपल्या धाकट्या बहिणीच्या नावाने विमा काढला. त्यानंतर ती नॉमिनी बनली त्याचा पहिला प्रीमियमही भरला. त्यानंतर तिने विम्याचे पैसे हडपण्यासाठी तिच्या प्रियकराच्या मदतीने धाकट्या बहिणीची हत्या केली. पोलिसांनी मोठी बहीण आणि तिच्या प्रियकराला अटक केलीय.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुजरातमधील वडोदरा येथे ही घटना घडलीय. येथील एका ३६ वर्षीय अझीझ दिवाण यांची हत्या त्यांच्या मोठ्या बहिणीने केली होती. मोठ्या बहिणीने बहिणीच्या नावावरील जीवन विमा पॉलिसीमधील ४० लाख रुपये हडपण्यासाठी कट रचत तिच्या प्रियकराच्या मदतीने धाकट्या बहिणीचा जीव घेतला. याप्रकरणी वडोदरा ग्रामीण पोलिसांनी मृताची मोठी बहीण फिरोजा दिवाण आणि तिचा प्रियकर रमीज शेख यांना अटक केली आहे.

तीन दिवसांपूर्वी अंकोडिया गावात अझीजचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघड झालं. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अझीजा गोरवा येथील तिच्या वडिलांच्या घरातून बाहेर पडताना दिसली. वडोदरा ग्रामीणचे एसपी सुशील अग्रवाल म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजच्या एका भागात एक माणूस अझीजला तिच्या घरापासून काही अंतरावर मोटारसायकलवरून लिफ्ट देताना दिसला.

आम्ही त्या व्यक्तीचा त्याचा चेहरा ओळखला आणि तो पीडितेच्या कुटुंबाला दाखवला. तो शेख असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याची चौकशी केली. त्याने अझीजाची हत्या केल्याची कबुली दिली. शेख हा फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. शेखने पोलिसांना सांगितले की, त्याचे पीडितेची बहीण फिरोजासोबत प्रेमसंबंध होते.

दरम्यान फिरोजाला पैशांची गरज होती. त्यात अझीजा हिचा त्याच्या नवऱ्याशी काहीतरी वाद चालू होता, आणि ती गेल्या सहा महिन्यांपासून ती तिच्या वडिलांसोबत राहत होती. फिरोजा तिच्या पतीसोबत त्याच घरात राहत होती. फिरोजाने अझीजाचा ४० लाख रुपयांचा जीवन विमा काढला होता. त्यात तिने स्वतःला नॉमिनी म्हणून घोषित केले. त्याने २८ नोव्हेंबर रोजी पहिली प्रीमियम रक्कम भरली. त्यानंतर तिने शेखला अझीजाची हत्या करण्यास सांगितलं.

अझीजाची हत्या करण्यासाठी फिरोजाने त्याला ७ लाख रुपये देण्याची सुपारी दिली. मंगळवारी, फिरोजाने अझीजाला काही सरकारी योजनांचे फायदे मिळावेत म्हणून त्यांच्यासाठी लेबर कार्ड बनवून घेण्यास राजी केलं. यानंतर फिरोजाने अझीजाला शेखसोबत जाण्यास सांगितले, जो तिला लेबर कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करणार होता. शेख अझीजाला आधी पाड्रा येथे घेऊन गेला. नंतर तो तिला अंकोडियातील एका निर्जन भागात घेऊन गेला. तेथे त्याने तिचा गळा दाबून खून केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 16 जानेवारीला महापालिका निवडणुकांचा निकाल

Beauty Tips : रिका वॅक्स नक्की काय आहे? जाणून घ्या त्याचे फायदे, महिलांनी एकदा करुनच बघा

रेल्वे स्टेशनबाहेरच रक्तरंजित थरार, चाकू आणि लोखंडी रॉडने ४० वार, तरूणाचा जागीच मृत्यू

Moles on Your Face: तुमच्या चेहऱ्यावर तीळ आहे? पाहा त्याचा नेमका काय अर्थ असू शकतो?

धुरळा उडाला! २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, १५ जानेवारीला होणार मतदान

SCROLL FOR NEXT