लग्नाच्या मिरवणुकीत काहीजण डीजेच्या तालावर थिरकत होते. अचानक नाचण्यावरुन काहीजण आपापसात भांडू लागले. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. या वादात नवरदेवाचा मृत्यू झाला. नवऱ्याला काठ्यांनी मारहाण झाली. एका तरुणाने वराच्या डोक्यावर बंदुकीच्या दस्त्याने जोरात हल्ला केला. हल्ल्यात नवरदेवाचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील गाझीपूरमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूरच्या दिलदारनगर पोलीस स्टेशन परिसरातील जगदीशपूर गावात लग्नाची मिरवणूक निघाली होती. मुलीच्या कुटुंबाने मुलाच्या कुटुंबीयांचे स्वागत केले. स्वागत समारंभादरम्यान डीजे सुरु झाला. मुलीच्या घरातील एकजण डीजेवर नाचत होता. काही कारणावरुन त्याचे मुलाच्या कुटुंबातील लोकांशी वाद झाला.
वाद वाढत गेल्याचे पाहून नवऱ्याच्या वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीकडच्या तरुणांनी नवऱ्याच्या वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून नवरा मध्ये पडला. मद्यधुंद तरुणांनी नवऱ्यावर मारहाण करायला सुरुवात केली. एका तरुणाने नवऱ्याच्या डोक्यावर बंदुकीच्या दस्त्याने जोरदार वार केला.
डोक्याला मार बसल्याने नवरदेवाला बेशुद्ध अवस्थेत गाझीपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. रात्री उपचार सुरु असताना नवऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्याने तो कोमामध्ये गेल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. यादरम्यान स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यांनी आरोपीकडून बंदुक जप्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.