फैय्याज शेख, साम प्रतिनिधी
सामान्य लोकांसाठी सरकार योजना आणत असते. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे योजनेचा फायदा अनेकांना मिळत नाही. घराचं स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सरकारने घरकुलाची योजना सुरू केलीय. पण भ्रष्ट अधिकारी योजनेचा फायदा सामन्य लोकांना पोहोचू देत नाही. योजनेचे पैसे लाभार्थ्यांना देण्यासाठी अधिकारी लाच मागत असतात. अशाच एका भ्रष्ट ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलाय. शहापूर तालुक्यातील वरस्कोळ गावात ही घटना उघडकीस आलीय
घरकुल योजनेचे पैसे काढून देण्यासाठी ग्रामसेवकाने आदिम कातकरी समाजाच्या एका कुटुंबाकडे ५००० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साफळा रचत ग्रामसेवकाला अटक केलीय. ग्रामसेवक सुरेश राठोड असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. ग्रामसेवक सुरेश राठोडने वरस्कोळ गावातील रहिवाशी कातकरी समाजाचे पप्पू शंकर वाघ यांच्याकडून लाच मागितली होती.
पप्पू शंकर वाघ यांना शासनाच्या योजनेतून घरकूल मंजूर झाले होते. पप्पू वाघ याने घरकुल योजनेला लागणारे दगड, विटा, सिमेंट व रेती मागवली होती. शासनाच्या नियमानुसार जर लाभार्थ्याने दगडी जोता बांधकाम केले. त्यानंतर पुढील बांधकामासाठी त्यांना धनादेश मिळाला. घरकुल योजनेचा पहिला हप्ता म्हणून त्या कुटुंबाला ग्रामपंचायत मधून ग्रामसेवक व सरपंच यांच्या सहीने बँकेचा चेक दिला जातो. हा चेक देण्यासाठी ग्रामसेवकाने त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली.
नंतर त्यात तडजोड करत तीन हजार रुपये चेकसाठी द्यायचे हे ठरलं. परंतु पप्पू वाघ यांनी त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या ग्रामसेवकाला अटक केली. आज दुपारी पप्पू वाघ हे ग्रामसेवकाला तीन हजार रुपये देणार होते. त्यावेळी हे लाचचे पैसे स्वीकारताना अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले.
विशेष म्हणजे काही महिन्यांपासून ग्रामसेवकाची बदली करण्यात यावी अशी, मागणी वरस्कोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सदस्यांनी केली होती. मात्र गटविकास अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर हा प्रकार घडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.