Uttar Pradesh crime news saam tv
क्राईम

Crime News: नंबर ब्लॉक केला, दुसऱ्याच मुलाशी केली मैत्री; रागाच्या भरात बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

Uttar Pradesh crime news: फर्रुखाबादमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे. या प्रकरणामागील कारणं आणि आरोपीची कबुली समोर आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रेम प्रकरणातून एक तरूणीची हत्या झाल्याचं समोर आलंय. या तरूणीचा मृतदेह १७ एप्रिल रोजी काली नदी पुलाजवळ आढळून आला. यावेळी तिची हत्या धारदार शस्त्राने हत्या केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी एक व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मात्र १८ एप्रिल रोजी तपासादरम्यान हा मृतदेह कनौज जिल्ह्यातील छिबरामऊ याठिकाणी राहणाऱ्या एका तरूणीचा असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गु्न्हा दाखल केला आहे.

मृत तरूणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अनीश आणि अजून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करणयात आला आहे. यावेळी पोलिसांनी कारवाई करत अनिशला अटक केलीये. यावेळी तपास केला असता या आरोपीकडून गु्न्हा करताना वापरलेला गमछा आणि बाईक जप्त करण्यात आलीये.

प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचं समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन अनीश आणि हत्या करण्यात आलेल्या तरूणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी या तरूणीने अनीशचा ब्लॉक केलं होतं. ती त्याच्याशी फोनवर बोलत नव्हती. ब्लॉक केल्यानंतर ती दुसऱ्या एका मुलाच्या संपर्कात होती. यामुळे अनीशला राग अनावर झाला.

अनीशने दिली कबुली

पोलिसांनी चौकशी केली असता अनीशने सांगितलं की, त्याने अनेकदा या तरूणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती त्याच्याशी बोलण्यास तयार नव्हती. अशावेळी रागाच्या भरात अनीश चाकू घेऊन घराबाहेर पडला. त्याने चेहऱ्यावर मास्क लावलं होतं. तरूणीच्या घराबाहेर पोहोचताच त्याने तिला शेवटचं बोलायचं आहे असं सांगितलं.

अनीशने तिला बाईकवर बसवून छिबरामऊ-जहानगंज मार्गावरील काली नदी पुलाजवळच्या झाडीमध्ये नेलं. त्याठिकाणी दोघांचा काही कारणावरून वाद झाला. अनीशने पुढे सांगितलं की, तरूणीने त्याचा अपमान केल्याने त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. तिला मरणासन्न अवस्थेत टाकून तो तिथून फरार झाला.

या गंभीर प्रकरणाचा तपास एसओजी सर्व्हिलन्स टीम आणि जहानगंज पोलिसांनी केला. या तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली. सध्या पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT