उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. हुंड्याच्या मोहापायी समलैंगिक मुलाचा जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची घटना घडली. मुलगा वैवाहिक सुख देत नाही याची तक्रार वैवाहितेने तिच्या सासरच्या कुटुंबियांकडे केली. तेव्हा तिच्या सासरच्या कुटुंबियांनी तिला मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसात गेले. त्यानंतर नवऱ्यानं रडत रडत पत्नीकडे घटस्फोट मागितला. (Latest News)
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सर्व घटनेचा भांडाफोड झाला. मुलगा समलैंगिक असल्याची माहिती कुटुंबियांना आधीपासून होती. परंतु हुंडा मिळावा, यासाठीच त्याचा विवाह जबरदस्तीने लावून दिल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी नवऱ्याच्या कुटुंबातील ५ लोकांवर हुंडा घेतल्याप्रकरणी आणि सासरवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, खागा पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या एका गावातील एका महिलेचा विवाह मनीष कुमार नावाच्या मुलाशी झाला होता. नव्या संसाराची स्वप्न घेऊन ही महिला सासरी आली. परंतु तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत नव्हता. तिला वैवाहिक सुख देत नसल्यानं तिने माहेरचा रस्ता धरला आणि सर्व हककीत घरच्यांना सांगितली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिची मनधरणी करत तिला परत सासरच्या लोकांसोबत सासरी पाठवलं.
प्रवास करत असताना सासरच्या लोकांनी या महिलेला मारहाण केली. प्रवासात घडलेल्या प्रकाराची माहिती तिने तिच्या नवऱ्याला सांगितली. त्यानंतर नवऱ्याने रडत रडत त्याने तिच्याकडे घटस्फोट मागितला. मी गे आहे, हुंड्यासाठी माझ्या घरच्यानी लग्न लावून दिले आहे, तुझी फसवणूक केली अशी कबुली त्याने दिली. नवऱ्याचे बोलणं ऐकून वैवाहितेला धक्का बसला.
याप्रकरणी मुलाचा मामा अमृतलाल, सासरा सुरेंद्र कुमार जायस्वाल, सासू ज्ञानवती , जेठ मुकेश जायस्वाल,पती मनीष विरोधात वैवाहितेचा छळ आणि हुंडा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, खागा पोलीस स्टेशनच्या परिसरातील महिलेचा विवाह सुरेंद्र कुमार जायस्वाल यांचा मुलगा मनीष जायस्वालशी झाला होता. या लग्नासाठी मनीषच्या घरच्यांनी मोठा हुंडा घेतला होता. लग्नासाठी तिच्या घरच्यांनी ३४ लाख रुपये खर्च केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.