Nashik Crime News Saam Tv
क्राईम

VIDEO: नाशिकमध्ये गुंडाचं रॉयल वेलकम, पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुंडाची मिरवणूक; पाहा व्हिडिओ

Nashik Crime News: नाशिकमधील सराईत गुंड जेलमधून सुटताच त्याची शरणपूर रोड परिसरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. अगदी पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुंडाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या गुंडावर कारवाई केलीय.

Girish Nikam

गुन्हेगारांचा सोशल मीडियावरचा वावर आणि त्याला तरुणाईची मिळत असलेली पसंती चिंतेचा विषय आहे. एखादा गुन्हेगार तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचा उदो-उदो करत जंगी मिरवणूक काढण्याचे प्रकारही वाढतायेत. पोलिसांनी कारवाई करुनही असे प्रकार सुरूच आहेत. नाशिकमध्येही असाच प्रकार समोर आलाय.

हर्षद पाटणकर हा गुंड एमपीडीए कायद्याअंतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. हर्षदची सुटका होताच त्याच्या समर्थकांकडून शरणपूर रोड परिसरात त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली.

नुसतीच मिरवणूक काढली नाही तर हॉर्नचा कर्णकर्कश्य आवाज करत अर्वाच्च घोषणाबाजी केली. या मिरवणुकीत सराईत गुन्हेगार, तडीपार गुंड आणि टवाळखोरांचाही सहभाग होता. हे थेट पोलिस यंत्रणेलाच आव्हान दिल्याचं मानलं जातंय.

मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाटणकरसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करत पाटणकरची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आलीय. चिंतेची बाब म्हणजे पाटणकरच्या बरोबर असलेल्या बाईकचा ताफा, अगदी तरुण मुलं त्याचे समर्थक आहेत. हद्दपार गुंडांना तरुणांचा मिळणारा असा पाठिंबा सामाजिक चिंतेचा विषय आहे. पाटणकर विरोधात सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची फेबुवारी २०२१ मध्ये तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शक्ति प्रदर्शन केलं होतं. सोशल मीडियावरची भाईगिरी किंवा तुरुंगवारी केल्यावरही अशा प्रकारे मिजास दाखवणे अशा प्रवृत्ती कायमच्या मोडून काढल्या पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

Dark Circles Symptoms: डोळ्यांखाली डार्क सर्कल कोणत्या कमतरतेमुळे येतात? ही आहेत लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील त्यांच्या राहत्या घरी पोहोचले

Bengali white saree: दुर्गापूजेला बंगाली महिला लाल बॉर्डर असलेली पांढरी साडी का नेसतात? जाणून घ्या खरं कारणं

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT