Pune News Saam TV
क्राईम

Pune News: चेष्टा, मस्करी नडली! एअर कॉम्प्रेसरने पोटात हवा भरल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Accident News: कंपनीतील तिसऱ्या मजल्यावर सोमवारी सकाळी धीरजसिंग काम करीत होता. त्यावेळी चेष्टा मस्करीतून धीरजसिंगने यंत्रांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या एअर कॉम्प्रेसरने

Ruchika Jadhav

Pune:

पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेष्टा मस्करीतून एका तरुणाने एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झालाय. हडपसर भागातील औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत ही घटना घडलीये. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोतीलाल साहू असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोतीलालचे मामा शंकरदिन यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी धीरजसिंग गोपालसिंग गौड याला अटक केलीय.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकरदिन आणि आरोपी धीरजसिंग हडपसर औद्योगिक वसाहतीतील पूना फ्लोअर अँड फूड्स कंपनीत काम करतात. दोन महिन्यांपूर्वी मोतीलाल कामासाठी मामा शंकरदिनकडे आला होता. मोतीलाल आणि धीरजसिंग यांची मैत्री झाली.

कंपनीतील तिसऱ्या मजल्यावर सोमवारी सकाळी धीरजसिंग काम करीत होता. त्यावेळी चेष्टा मस्करीतून धीरजसिंगने यंत्रांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या एअर कॉम्प्रेसरने मोतीलालच्या गुदद्वारात हवा भरली. हवा पोटात शिरल्यामुळे शारीरिक इजा होऊन मोतीलालचा जागीच मृत्यू झाला.

मजा मस्करीत कधी काय होईल काही सांगता येत नाही. अनेकवेळा मोठ्या चुका करून वक्ती मृत्यूच्या दहाडेतून परत येतात. मात्र अनेकदा पुढे मोठं संकट आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्या ठिकाणी लिहिलाय याची कुणालाच काही कल्पना नसते. सर्व नेहमीसारखं सुरू असताना मस्करीची कुस्करी होऊन अनेकांचा आजवर मृत्यू झालाय. त्यामुळे प्रत्येकाने मजा मस्करी करताना आपल्यामुळे एखाद्याला हाणी पोहचणार नाही याबात काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

SCROLL FOR NEXT