Wardha Crime saam tv
क्राईम

Wardha Crime: चमत्काराने पायाचा आजार बरा करतो, भोंदूबाबाने ६५ वर्षीय व्यक्तीला घातला गंडा

Crime News: वर्ध्यात एका भोंदू बाबाने अतींद्रिय शक्ती असल्याचा दावा करून पायाच्या आजारावर चमत्कारी उपचार करण्याचे आमिष दाखवले आणि व्यक्तीचा विश्वास संपादन करून ५५ हजार रुपये उकळत फसवणूक केली.

Dhanshri Shintre

चेतन व्यास / साम टीव्ही न्यूज

वर्ध्यात भोंदू बाबाने अतींद्रिय शक्ती असल्याचा दावा करत पायाच्या आजारावर चमत्काराने उपचार करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ५५ हजार रुपये उकळले. मात्र, महिलेने सतर्कता दाखवत त्वरित डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भोंदू बाबासह दोघांना अटक केली. अटकेनंतर तिघांवर वर्धा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकेतील आरोपींची नावे सलाउद्दीन अब्दुल हफीज, अजीजन सलाउद्दीन अब्दुल हफीज आणि सायरा बानो शरीफ (सर्व रा. राजस्थान) अशी आहेत. या प्रकरणामुळे अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या भोंदू बाबा टोळक्यांविरोधात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

सुदामपुरी येथील ६५ वर्षीय प्रकाश पुंडलिक शिंदे यांना उजव्या गुडघ्याच्या तीव्र दुखण्यामुळे त्रास होत होता. अनेक उपचार करूनही आराम न मिळाल्याने ते चिंतेत होते. याच दरम्यान, एका व्यक्तीने त्यांना थांबवून आपण तपस्येद्वारे अतींद्रिय शक्ती मिळवल्याचा दावा केला. त्याने शिंदेंना जादूटोण्याचा प्रभाव असल्याचे सांगत पाय बरा करण्यासाठी ८५ हजार रुपयांची मागणी केली. विश्वास संपादन करत ५० हजार रुपयांवर सौदा झाला.

आरोपीने तेल लावून मंत्रमुग्ध पाणी दिले व प्लास्टिक नळीच्या साहाय्याने लाल द्रव काढून ते अशुद्ध रक्त असल्याचा दावा केला. मात्र, दुसऱ्या दिवशीही त्रास कायम राहिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे अंधश्रद्धेचा फायदा घेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांविरोधात जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.

दुसऱ्या दिवशी प्रकाश शिंदे यांच्या घरी दोन पुरुष आणि एक महिला आले. त्यांनी पुन्हा अलौकिक शक्तीच्या मदतीने वेदना कमी करण्याचे आश्वासन देत फसवणुकीचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी शिंदे यांना संशय आला. त्यांनी आरोपींना घरात बोलावून ५ हजार रुपये दिले आणि पहिल्या दिवशी झालेल्या प्रकाराचा व्हिडीओ त्यांना दाखवला.

हा व्हिडीओ पाहून तिघे घाबरले आणि त्यांनी पैसे परत देण्याची कबुली दिली. एवढेच नाही तर ५० हजार रुपये परतही दिले. यानंतर शिंदे यांनी डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तीनही आरोपींना अटक केली. आरोपी महिलेकडे तीन वेगवेगळे आधार कार्ड आढळले. सध्या शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT