four youth hits police in kolhapur  Saam tv
क्राईम

Kolhapur Crime News : कोल्हापुरात पेट्रोल पंपावर राडा, दगडफेकीत कर्मचा-यासह पोलिस गंभीर जखमी

पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य समजून घेत तातडीने तपास सुरु केला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापुरात पोलीस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशांच्या वादातून चौघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून अन्य चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Maharashtra News)

पाेलिसांकडून घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एक कार डिझेल भरण्यासाठी आली. त्यावेळी कारमधील चौघांनी पैशांवरून कर्मचारी किरण आवळे याच्याशी वाद घातला.

ड्युटीवर असलेले कर्मचारी अल्ताफ कुरेशी यांनी चौघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण डिझेल भरण्यासाठी आलेल्या तरुणांनी थेट हाणामारीला सुरुवात केली. तसेच निघून जाताना दगडफेक केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या हाणामारीत आणि दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाली. दरम्यान मारहाण करणाऱ्या दोघांना पकडले आहे. तसेच चौघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT