Pune : विनायक मेटेंच्या बहिणी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

या प्रकरणाचा विमाननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
vimannagar police booked vinayak mete sister and nephew in illegal possession of flat
vimannagar police booked vinayak mete sister and nephew in illegal possession of flat saam tv
Published On

- सचिन जाधव

Pune News :

पुण्यात विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निवासस्थानावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विनायक मेटे यांच्या बहिण व त्यांच्या मुलाने घर हडपल्याचा आराेप खूद्द विनायक मेटे यांच्या मुलाने केला आहे. केवळ आरोप करुन ते थांबले नाहीत तर या प्रकरणी त्यांनी पाेलीसांत धाव घेतली आहे. विनायक मेटे यांच्या मुलाच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी मेटेंच्या बहिणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा विमाननगर पोलीस स्टेशन येथे नाेंदविला (vimannagar police booked vinayak mete sister and nephew in illegal possession of flat) गेला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मेटे यांच्या पत्नीच्या नावावर असलेली सदनिका मेटे यांच्या बहिणीने बळकावली आहे अशी तक्रार प्राप्त झाली. आशुतोष विनायक मेटे (वय २०, रा. कोरेगाव पार्क) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मेटे यांची बहिण सत्यशीला महादेव जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश (दोघे रा. पंचगंगा सोसायटी, ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vimannagar police booked vinayak mete sister and nephew in illegal possession of flat
Maratha Reservation: पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा समाजाची मन की बात कधी ऐकणार? मराठा क्रांती माेर्चा

जाधव यांनी कुलूप तोडून सदनिकेचा बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांनी विमाननगर भागातील गंगापूरम सोसायटीत सदनिका खरेदी केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान मेटे यांनी सदनिका बहीण सत्वशीला आणि भाचा आकाश यांना भेट दिली होती असा दावा जाधव यांच्याकडून केला गेला आहे. या प्रकरणाचा विमाननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

vimannagar police booked vinayak mete sister and nephew in illegal possession of flat
Tuljabhavani Temple Fake Website : तुळजाभवानीचे बनावट अ‍ॅप अन् वेबसाईट उघडकीस, भक्तांची लूट; एकावर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com