forest department arrests navsubhai lohar Saam Digital
क्राईम

Nashik News : गुजरातचा तस्कर पुष्पाला सिनेस्टाइल पाठलाग करून पकडलं; नाशिकच्या जंगलात करायचा साग-खैराची तस्करी!

मागील अनेक वर्षांपासून गुजरातचा हा पुष्पा दहा ते बारा जणांची टोळी घेऊन महाराष्ट्रातील जंगलात घुसून सर्रासपणे खैर आणि सागाची तस्करी करत होता. पैशांच्या मोबदल्यात तस्करीसाठी तसेच जंगलातील चोरवाटा दाखवण्यासाठी ताे स्थानिक आदिवासींची मदत घेत असे.

अभिजीत सोनावणे

गुजरातचा कुख्यात खैर आणि साग तस्कर पुष्पा उर्फ नवसूभाई लोहार या वनविभागाच्या तीन पथकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नाशिक जिल्ह्यातील जंगलात घुसखोरी करत खैर, सागाच्या झाडांची कत्तल करून लोहार हा तस्करी करायचा. लाेहार याच्या माध्यमातून महाराष्ट्र गुजरात सीमेवरील जंगलात तस्करांची टोळी आजही कार्यरत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वनविभाग लोहारच्या मागावर हाेते. त्याला पकडण्यात वन विभागास यश आले आहे. नवसू भाई लोहार वनविभागाच्या हाती लागल्याने खैर आणि सागाच्या तस्करीचे आंतरराज्यीय रॅकेट उघड हाेण्यास मदत हाेणार आहे अशी माहिती डॉ. सुजित नेवासे (विभागीय व्यवस्थापक वन विकास महामंडळ) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT