Five members of family found dead at antyodaya nagar Bikaner in Rajasthan, Police on the spot investigation underway/Social Media SAAM TV
क्राईम

Bikaner Shocking News : एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह बघून शेजारीही हादरले, घरातलं भयंकर दृश्य

Bikaner District News : बिकानेर जिल्ह्याच्या मुक्ता प्रसाद परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या केली. पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा त्यात समावेश आहे.

Nandkumar Joshi

Rajasthan Latest News :

राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह घरात आढळून आले. कर्जबाजारीपणामुळं कंटाळून त्यांनी मृत्यूला कवटाळल्याचं सांगितलं जात आहे.

बिकानेरच्या (Bikaner News) अंत्योदय नगरमध्ये गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरात आढळून आले. (Five Members of Family Found Dead) त्यांनी कर्जामुळे तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पती-पत्नी, दोन मुलं आणि एका मुलीचा यात समावेश आहे. अख्ख्या कुटुंबानं (Family) हे पाऊल का उचललं यामागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, चार जणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली असावी. तर एकानं विष पिऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.

या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. एकाच वेळी पाच जणांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सर्व बाजूंनी तपास करणार

पोलिसांच्या माहितीनुसार, बिकानेर जिल्ह्याच्या मुक्ता प्रसाद परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या केली. पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा त्यात समावेश आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी तिथे पोहोचले. तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

आर्थिक चणचण

हे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत होते. ते सर्व त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण कळू शकलेले नाही. सर्व बाजूने या घटनेचा तपास केला जात आहे. मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, आधी पत्नी आणि त्यानंतर तीन मुलांना गळफास दिला आणि त्यानंतर पतीनं विष पिऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृत व्यक्तीने खूप कर्ज घेतलं होतं. ते फेडता न आल्यानं हे कुटुंब अनेक दिवसांपासून त्रस्त होतं, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT