Nanded Latest News 
क्राईम

Heartbreaking : मोबईलनं घेतला बाप-लेकाचा जीव, एकाच दोरखंडाने दोघांनी जीवनयात्रा संपवली

Heartbreaking Story: वडीलांकडे वह्या, पुस्तकं आणि मोबाईलसाठी हट्ट धरला. नापिकीमुळे हैराण झालेल्या राजेंद्र पैलवार यांनी मुलाची समजूत काढली. पण हट्ट पुरवला न गेल्याने मुलाने थेट शेतात जाऊन गळफास घेतला. मुलाचा मृतदेह पाहून त्याच दोरखंडानं बापानेही जीवनयात्रा संपवली

Namdeo Kumbhar

Nanded Latest News : भौतिक सुखाच्या वस्तू न मिळाल्याने मुलांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत... मात्र नांदेडमध्ये अभ्यासासाठी वह्या, पुस्तकं आणि मोबाईल न मिळाल्याने बाप-लेकाने टोकाचा निर्णय घेतलाय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

वह्या-पुस्तकाचं कारण, बाप-लेकाचं मरण, खचलेल्या बापाची करुण कहाणी

हा आहे 17 वर्षाचा ओमकार पैलवार.... अभ्यासात हुशार....तो नांदेडच्या उदगीरमध्ये अकरावीत शिक्षण घेत होता.. त्यानं वह्या, पुस्तकं आणि अभ्यासासाठी मोबाईल घेण्याची मागणी आपल्या बापाकडे केली... मात्र अल्पभुधारक असलेले राजेंद्र पैलवार मुलाचा हट्ट पुरवू शकले नाहीत.. त्यामुळे नाराज झालेल्या ओमकारने शेतात जाऊन गळफास घेत जीवनयात्रा संपवली... मात्र हा घटनाक्रम इथंच थांबला नाही तर ओमकार पैलवारचा बाप राजेंद्र पैलवार मुलाचा शोध घेण्यासाठी शेतात गेला आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनचं सरकली. झाडाला लटकत असलेला मुलाचा मृतदेह खाली उतरवून त्याच दोरखंडानं राजेंद्र पैलवार यांनी गळफास घेत मृत्यूला कवटाळलं.... त्यामुळे नांदेड जिल्हा हादरुन गेलाय... मात्र बाप लेकाच्या आत्महत्येआधी नेमकं काय घडलं होतं? पाहूयात....

ओमकार उदगीरमध्ये इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होता

सुट्टीनिमित्त ओमकार घरी आला होता

ओमकारने आपल्या वडीलांकडे वह्या, पुस्तकं आणि मोबाईलसाठी हट्ट धरला

नापिकीमुळे हैराण झालेल्या राजेंद्र पैलवार यांनी मुलाची समजूत काढली

पण हट्ट पुरवला न गेल्याने मुलाने थेट शेतात जाऊन गळफास घेतला

मुलाचा मृतदेह पाहून त्याच दोरखंडानं बापानेही जीवनयात्रा संपवली

राजेंद्र पैलवार हे अल्पभूधारक शेतकरी... मुलाच्या शिक्षणासाठी जीव तोडून मेहनत करायचे... मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी पैशांची जुळवा-जुळव करण्याचा प्रयत्न केला... मात्र ही जुळवा-जुळव न झाल्याने आधी -लेकाने आणि मुलाचीइच्छा पुरवता न आल्यानं नंतर बापानंही आत्महत्या केली.

नांदेडच्या बिलोलीतील मिनकीत बाप-लेकांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.. त्यामुळे हा मुद्दा संपूनही जाईल... मात्र नापिकी, शेतकरी आणि त्यांच्या मुलांची नैराश्यता यातून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेऊ नये, यासाठी समुपदेशन करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT