Akola  Saam tv
क्राईम

Akola : अकोल्यात बापाने पोटच्या मुलाला संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

father killed son in akola : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच पोटच्या मुलाला संपवल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, अकोला

Akola Crime News :

अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच पोटच्या मुलाला संपवल्याची घटना घडली आहे. आपल्या दुसऱ्या मुलाच्या मदतीनं वडिलांना मुलाला संपवलं आहे. अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. संदीप नागोराव गावंडे (वय २६) असं मृत तरुणाच नाव आहे. तर नागोराव कर्णाजी गावंडे असं मारेकरी वडिलांचं नाव आहे. मुलाची हत्या करून झाल्यानंतर वडील आणि मारेकरी भाऊ हे सर्व बाहेरगावी निघून गेले आणि आज दुपारी घरी परतले. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील टिटवा गावात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास संदीप गावंडे याचा राहत्या घरात हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. दरम्यान संदीपच्या घरातील सर्वजण बाहेरगावी गेले होते.

घरातील लोक आज दुपारी घरी परतले असता त्यांना घरात संदीप मृत अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी एकच टाहो फोडला. याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली आणि पिंजर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी पंचनामा करून तपासा दरम्यान वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अकोला बार्शीटाकळी तालुक्यातल्या टिटवा गाव या गावात नागोराव गावंडे हे वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुलं असून त्यातील एकाचं नाव संदीप आहे. मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता.

दरम्यान, संदीपच गावातील एका अनुसूचित जाती वर्गातील कुटुंबातील मुलीशी प्रेम होतं. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निश्चय घेतला. परंतु हे प्रेम संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हतं. याच्यावरून अनेकदा त्यांच्या घरात व्हायचा. त्यामुळ दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली.

अन् बापाने रचला बनाव

त्या मुलीवर प्रेम का केले आणि लग्नही करतो, असा सवाल वडील नागोराव यांनी करून मृत संदीपसोबत वाद घातला. या दरम्यान त्याच्याच भावाने आणि वडिलांनी घरातच संदीपचा गळा आवळून संपवले. त्यानंतर संदीपच्या हात पाय वायरने बांधून घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले.

आज दुपारी घरी परतले असता आपल्या मुलाला कोणीतरी मारल असा बनाव रचला. पण पोलिसांच्या तपासात सर्व बिंग फुटलं. सद्यस्थितीत मारेकरी वडील आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंदिरातून कधीही 'या' वस्तू घरी आणू नका; वाईट शक्ती पाठ सोडणार नाही

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Skin Care Tip: बटाटा लावा आणि चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT