जयसिंगपूर पोलिसांनी कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला
या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे
पोलिसांनी आरोपींकडून ६८,४०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या
कारवाईत प्रिंटर आणि इतर साहित्य मिळून ८८,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
बनावट चलनाच्या साखळीबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू
कोल्हापुरातील उदगावात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात कारवाई करून बनावट नोटा तयार करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्या ताब्यातून ६८,४०० रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ८८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर कोल्हापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर पोलिसांना बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेट संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांना सांगण्यात आलं होत की, उदगाव आणि इचलकरंजी परिसरात काही जण बनावट चलनी नोटा तयार करून बाजारात खपवण्याच्या तयारीत आहेत. या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपींविरोधात सापळा रचला.
ठरलेल्या प्लॅनिंगनुसार पोलीस घटनास्थळावर पोहचले. पोलिसांनी उदगावातील गट क्रमांक १४५ मधील गोट्यात आणि इचलकरंजीतील बरगे मळा परिसरात छापा टाकला. यात १०० रुपयांच्या ६८४ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटा हुबेहूब असल्याने त्या बाजारात सहज खपवता येणार होत्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे होत्याचं नव्हतं होता होता राहिलं.
अटक करण्यात आलेले आरोपी साहिल रफिक मुल्लाणी , ओंकार बाबुराव तोवार आणि रमेश संतराम पाटील अशी आहेत. त्यांच्याकडून एचपी स्मार्ट टँक ५२५ मॉडेलचा प्रिंटर, प्लॅस्टिक स्केल, कटर, कागद आदी साहित्य जप्त करण्यात आले. हे साहित्य १९,६०० रुपयांचे आहे. पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांच्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस या कसून चौकशी करत असून हा कारभार कोणाच्या सांगण्यावरून सुरु होता का? हे तपासात समोर येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.