Kandivali News Saam Digital
क्राईम

Kandivali News: क्रूरतेचा कळस! फक्त तीन हजारांसाठी ज्येष्ठ महिलेची दगडाने ठेचून हत्या; कांदिवलीतील घटनेने खळबळ

Kandivali Crime News: कांदिवली परिसरात पदपथावर राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तिच्याकडे पैसै असल्याच्या संशयावरून ही घटना घडली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी कचरा वेचणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

Sandeep Gawade

Kandivali News

कांदिवली परिसरात पदपथावर राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तिच्याकडे पैसै असल्याच्या संशयावरून ही घटना घडली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी कचरा वेचणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. कांदिवलीमध्ये बुधवारी (ता. ७) ही घटना समोर आली. दरम्यान आरोपी मन्सूर शेखला पोलिसांनी काही तासरातच अटक केली आहे. चोरीच्या उद्देशाने त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे एसीपी शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप मन्सूर शेख आणि पीडित अनुसया सावंत हे दोघेही चारकोप भागातील हिंदुस्तान नाक्याजवळच्या पदपाथावर राहत होते. दिवसा भिक मागून रात्रीच्या वेळेस अनुसया पदपथावर झोपत होत्या. अनुसया यांच्याकडे एक पिशवी होती. त्यात काही पैशांची बचत केल्याचे मन्सूरला समजले होते. रात्री ती पिशवी चोरी करण्याचा प्रयत्न त्याने केला, त्यात त्याला यश आलं नाही. त्यामुळे मन्सूरने बुधवारी रात्री उशिरा झोपेत असलेल्या अनुसयाची दगडाने ठेचून हत्या केली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिच्याजवळची पिशवी त्याने घटनास्थळावरून पळ काढला. सकाळी पाच वाजता चारकोप पोलिस घटनास्थळी पोहोचले. महिलेला शताब्धी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे तपास सुरू केला. काही तासात आरोपी मन्सूर शेखला अटक केली. चोरीच्या उद्देशाने त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे एसीपी शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT