Crime News Saam TV
क्राईम

Shocking : मोठ्या मुलाने केली आई आणि धाकट्या भावाची हत्या, दुहेरी हत्याकांडामागे धक्कादायक कारण

Andhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. धाकट्या भावावर आई जास्त प्रेम करते म्हणून मोठ्या भावाने रागाच्या भरात आई आणि भावाची हत्या केली. आरोपी श्रीनिवासने स्वतः पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Alisha Khedekar

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड

मोठ्या मुलाने आई आणि धाकट्या भावाची निर्घृण हत्या केली

आई धाकट्या मुलावर जास्त प्रेमामुळे आरोपीला रागात आला होता

घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली

भावाच्या नात्याला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका मुलाने त्याच्या भावाची आणि आईची निर्घृण हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजे धाकट्या भावावर आई जास्त प्रेम करते म्हणून मोठ्या भावाने रागाच्या भरात हे पाऊल उचललं असल्याचं उघडकीस आलं आहे. सदर घटना आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीचे नाव श्रीनिवास आहे तर आई महालक्ष्मी आणि धाकटा भाऊ रवी तेजा याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा श्रीनिवास आणि त्याच्या आईच कडाक्याचं भांडण झालं. श्रीनिवासला बऱ्याच काळापासून असे वाटत होते की त्याची आई नेहमीच त्याच्या धाकट्या मुलाची बाजू घेते. कुटुंबातील कोणत्याही वादात श्रीनिवास नेहमीच एकटा पडायचा. यामुळे आईच्या अशा वागण्याचा त्याला सतत त्रास व्हायचा आणि राग येत होता.

रविवारी रात्री आईसोबत झालेल्या वादात श्रीनिवासच्या पोटात असलेल्या रागाचा उद्रेक झाला. रागाच्या भरात त्याने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि त्याने त्याच्या आई आणि भावावर वार केले. महालक्ष्मी आणि रवीचा आवाज ऐकून शेजारचे तातडीने घटनास्थळी आले. शेजारी येईपर्यंत ते दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. दोघांनाही रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

या हत्येनंतर श्रीनिवासने स्वतः पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली, शिवाय त्यानेच ही हत्या केल्याचंही कबूल केलं. प्राथमिक चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि तो मानसिकदृष्ट्या खचलेला असल्याचे सांगितले. दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मित्र पक्षाला सोबत घेतल्यानंतर भाजप त्याचा घात करतो - हर्षवर्धन सपकाळ

Homemade Date Chutney: आंबटगोड खजूर चटणीची परफेक्ट रेसिपी, जाणून घ्या झटपट पटापट

Crime: मुलीला शेतात खेचत नेलं, तिघांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Municipal Corporation Elections: महापालिकेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Unnao Case : बलात्कार प्रकरणात भाजपच्या माजी आमदाराला दिलासा; हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

SCROLL FOR NEXT