Sangli Crime Saam Tv
क्राईम

Sangli Crime: सांगलीत खळबळ, आर्थिक वादातून तरुणाची हत्या; आरोपीच्या आईने गळफास घेत संपवलं आयुष्य

Sangli Police: सांगलीमध्ये संपत्तीच्या वादातून दोघांनी एका व्यक्तीची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीच्या आईने आत्महत्या केली. या दोन्ही घटनांमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. सांगली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संशयिताच्या आईने गळफास लावून आयुष्य संपवलं. या घटनेमुळे सांगली हादरले आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आर्थिक वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे एका तरुणाची पैशांच्या देवाण-घेवाणीतून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणाने ही हत्या केली त्याच्या आईला मुलाच्या कृत्यामुळे मोठा धक्का बसला. या तरुणाच्या आईने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान कवठेमंकाळ पोलिसांनी तरुणाच्या हत्येप्रकरणात दोन जणांना अटक केली.

कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण वादातून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाची आरोपी सुशांत शेजुळ या तरुणाने डोक्यात दगड घालून हत्या केली. सदर हत्येची बातमी गावात पसरली. संशयित तरुण सुशांत शेजुळ याची आई विमल शेजुळ यांना आपल्या मुलाने हत्या केल्याची बातमी समजली. गावातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी. या हत्येची गावभर जोरदार चर्चा झाली.

आपल्या मुलाने हत्या केल्याच्या धक्क्यातून आरोपीची आई विमल शेजुळ राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटनांमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनेची नोंद कवठेमंकाळ पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. कवठेमंकाळ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT