Dhule Crime News Update 
क्राईम

Crime : गर्लफ्रेंडला भेटायला गेला, ७ जणांनी जीव घेतला, कुटुंबियांनी मारेकर्‍याच्या घरासमोरच केला अंत्यविधी

Crime News Update: मित्रांसोबत गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण याबाबत मुलीच्या कुटुंबियांना समजले. त्यांनी सर्वांना डांबूने ठेवले, त्यानंतर जबर मारहाण केली. त्यामध्ये तरूणाचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

भुषण अहिरे, साम टीव्ही न्यूज

Dhule Crime News Update : तरुणाला ठेचून मारल्यानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह संबंधीत मारेकऱ्यांच्याच घरासमोर आणून अंत्यविधी केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या कालापाणी या गावात घडली आहे. मृत तरुणाच्या गावातील ग्रामस्थांनी मारेकऱ्यांच्या घराची देखील नासधूस केली आहे. त्यानंतर गावातील ग्रामस्थ गाव सोडून गावाबाहेर राहण्यासाठी निघून गेले आहेत. तरूणाला मारणाऱ्या सात जणांपैकी एकाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिरपूर तालुक्यातील उमरगा या गावात राहणारा कमलसिंग वसावे हा वीस वर्षीय तरुण आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी तिघा मित्रांसह शिरपूर तालुक्यातील कालापाणी या गावात गेला होता. प्रियसीच्या कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी चौघा तरुणांना एका घरात डांबून ठेवलं. त्यानंतर त्यांना जबर मारहाण केली, त्यातून एका तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संतप्त नातेवाईकांनी या तरुणाला पकडत त्याला जबर मारहाण केली. यात या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, या तरुणाचा मृतदेह नाल्यात फेकत संतप्त मुलगा अंधारात पळून गेल्याचा बनाव केला.

ही बाब पोलीसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांपैकी एकाला ताब्यात घेतले. त्यातील आणखी फरार सहा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. परंतु मृत तरुणाच्या नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह संबंधित मारेकऱ्याच्या घरासमोरच आणून त्याचा अंत्यविधी केला. या प्रकारामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरल्याने गावातील ग्रामस्थ गाव सोडून गावाबाहेर निघून गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT