Crime News  Yandex
क्राईम

Dhule Crime: बसमधून उतरताना हातचलाखी करत सोन्याचे दागिने लंपास; मुद्देमालासकट दोघा महिलांना अटक

Dhule News: देवपूर पोलिसांच्या डीबी पथकाने तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेच्या आधारे मालेगाव येथील सोनपोत चोरणाऱ्या टोळीतील दोघा महिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

भूषण अहिरे

Dhule Crime News:

धुळे शहरात एका वृद्ध महिलेच्या पर्समधून तीन तोळ्याची सोन्याची पोत पळवणाऱ्या महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देवपूर पोलिसांच्या डीबी पथकाने तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेच्या आधारे मालेगाव येथील सोनपोत चोरणाऱ्या टोळीतील दोघा महिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, धुळे (Dhule) शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सावरकर पुतळा या ठिकाणी बसमधून उतरताना एका वृद्ध महिलेच्या पर्स मधून तीन तोळ्याची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर महिलेने तात्काळ या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली.

महिलेच्या तक्रारीनंतर देवपूर पोलिसांच्या डीबी पथकाने तपासाची चक्र फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे मालेगाव येथील सोनपोत चोरणाऱ्या टोळीतील दोघा महिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Crime News In Marathi)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पोलिसांनी या दोघा महिलांना चाळीसगाव चौफुली या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून, या दोघा महिलांनी चोरी केलेली सोन्याची पोत देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. या सोन्याच्या पोतची किंमत जवळपास 90 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिकमध्ये पतीकडून पत्नीची हत्या..

नाशिकमध्ये (Nashik Crime) पतीसोबत झालेल्या भांडणात पत्नीला मारहाण झाली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेबाबत पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. विवाहीत महिलेच्या हत्येने सध्या परिसरात खळबळजनक वातावरण पसरलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

भयंकर! शायनिंग मारायला गेला अन् ट्रेनच्या खाली चिरडला, २ किमीपर्यंत फरफटत गेला, पण... व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल

India First Car: भारतात पहिली कार कधी आली? जाणून घ्या इतिहास

GK: वॉश बेसिनचा रंग नेहमीच पांढरा का असतो?

Central Railway : मुंबईत पावसाची जोरदार हजेरी! मध्यरेल्वे अर्धा तास उशिराने; प्रवाशांची तारांबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT