Dhule Crime News Saam Tv
क्राईम

Dhule : सातव्या बायकोने पोटच्या मुलांसह केली आत्महत्या, नवऱ्याच्या 'त्या' कृत्याने सर्वच हादरले

Dhule Crime News : धुळ्यात विषारी द्रव्य प्राशन केल्याने आई व तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाच वर्षीय मुलावर उपचार आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • विष प्राशन केल्याने आई व तीन वर्षीय मुलाचा मृत्यू

  • पाच वर्षीय मुलगा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

  • पतीच्या छळाचे नातेवाईकांकडून आरोप

  • हत्या की आत्महत्या? पोलिसांकडून तपास सुरू

भूषण अहिरे, धुळे

धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील आंबे गावात धक्कादायक घटना घडली आहे. विषारी औषध प्राशन करून आई व तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. पतीच्या छळाला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. या दृघटनेत महिलेचा आणि तिच्या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून गंभीर अवस्थेत असलेल्या पाच वर्षीय मोठ्या मुलावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. विवाहितेच्या नातेवाईकांनी पतीनेच महिलेची हत्या केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती संजय पावरा (वय वर्ष 30 ) असे मृत महिलेचे नाव असून राहत्या घरात त्यांनी आपल्या दोन मुलांसोबत विषारी द्रव्य प्राशन केल्याने बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. घटनेनंतर आई आणि दोन्ही मुलांना शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता भारती पावरा आणि त्यांचा लहान तीन वर्षाचा मुलगा चिराग संजय पावरा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर पाच वर्षीय मोठा मुलगा रियांश संजय पावरा हा गंभीर असून त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी पतीच्या छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले असल्याचं म्हटलं. संबंधित घटनेतील महिला ही सदर इसमाची सातवी पत्नी असून यापूर्वी तीन पत्नीना अशाच प्रकारे मारले असल्याचा मुलीच्या नातेवाईकांनी खळबळ जनक आरोप केला.

संबंधित पतीवर गुन्हा दाखल करून मृत विवाहितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली असून, हि घटना संशयास्पद असल्याने ही हत्या की आत्महत्या? याचा तपास पोलीसांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगली जिल्ह्यामध्ये तुफान गारांचा पाऊस

फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव; १३ जणांचा मृत्यू, स्थानिकांची मदतीसाठी धावाधाव

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT